केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाचा विचार केला जाऊ शकतो…

सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाचा विचार केला जाऊ शकतो…

दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (3 मे) महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाचा विचार केला जाऊ शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने सांगितले की, ईडीकडून करण्यात आलेली अटक आणि रिमांड याच्याविरुद्ध अरविंद केजरीवाल यांनी याचिका दाखल केली आहे, परंतु या याचिकेवर चर्चा करण्यासाठी वेळ लागू शकतो.त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी घेण्याबाबत विचार करता येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.दरम्यान, यावर ७ मे रोजी सुनावणी होणार आहे.

हे ही वाचा:

आमदार किरण सरनाईकांच्या भावाच्या कारला अपघात, पाच जणांचा मृत्यू!

ऑनलाईन फसवणुकीसाठी गुन्हेगार लढवत आहेत नवी शक्कल!

‘सीबीआय’ भारतीय संघराज्याच्या नियंत्रणाखाली नाही

पाकिस्तानातील सिंधी समाज करणार ‘राम लल्लाचा जयघोष’

खंडपीठाने दोन्ही पक्षांना सावध करत म्हटले की, न्यायालय जामीन देईलच असे समजू नका. आम्ही जामीन देऊ अथवा न देऊ, परंतु आम्ही प्रत्येक बाजूसाठी येथे उपस्थित आहोत आणि यामुळे कोणालाही आश्चर्य वाटता काम नये.

दरम्यान, दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक करण्यात आली होती.त्यानंतर १ एप्रिल रोजी केजरीवाल यांची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. २३ एप्रिल रोजी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने त्याची न्यायालयीन कोठडी ७ मेपर्यंत वाढवली होती. तसेच केजरीवाल यांच्याशिवाय बीआरएस नेते के. कविता आणि अन्य आरोपी चरणप्रीत यांच्या कोठडीतही ७ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

 

Exit mobile version