नीट यूजी परीक्षा रद्द होणार नाही, पुन्हा परीक्षा नाही…सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

२३ लाख विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी उचलले पाऊल

नीट यूजी परीक्षा रद्द होणार नाही, पुन्हा परीक्षा नाही…सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नीट यूजी ही प्रवेश परीक्षा रद्द करण्यास नकार देत त्यासंदर्भातील याचिका फेटाळल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र न्यायालयाने एनटीए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीला सांगितले आहे की, त्यांनी या परीक्षेचे सर्व निकाल नव्याने तयार करावेत. कारण त्यातील एका प्रश्नाच्या उत्तराचा चौथा पर्याय योग्य होता तर दुसरा अयोग्य होता.

मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी यासंदर्भात हा निर्णय दिला. ते म्हणाले की, परीक्षेची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे, हे सांगणारे पुरावे नाहीत.

या संपूर्ण प्रक्रियेत प्रचंड घोळ असून ही प्रक्रियाच सडली आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला होता. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनीही असाच आरोप केला होता पण सर्वोच्च न्यायालयाच्या आरोपांमुळे ही परीक्षा रद्द होणार नाही हे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे या मुद्द्यावरून केवळ राजकारण करणाऱ्यांना एक चांगली चपराक मिळाली आहे, अशी भावना लोक व्यक्त करत आहेत.

हे ही वाचा:

आमदार अतुल भातखळकर भाजपाच्या माध्यम विभागाचे केंद्रीय समन्वयक

‘नवरत्न’ अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल !

‘मोदी ३.0 सरकार’च्या अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महाग?

या परीक्षा रद्द व्हाव्यात आणि नव्याने परीक्षा घेण्यात याव्यात यासाठी याचिका करण्यात आल्या होत्या पण प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कारणावरून आणि त्याचे लाभार्थी फार मोठ्या संख्येने विद्यार्थी ठरलेले नाहीत हे लक्षात घेता २३ लाख विद्यार्थ्यांना का म्हणून पुन्हा परीक्षेला बसण्यास भाग पाडावे असा विचार न्यायालयाने केला. ४७५० केंद्रात ५७१ शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली.

एमबीबीएस, बीडीएस, आयुष व इतर सरकारी कोर्सेससाठी ही परीक्षा घेण्यात येते.

४ जूनला जेव्हा या परीक्षेचा निकाल लागला तेव्हा पेपर लीकमुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप केला जाऊ लागला. त्यातून मग ही परीक्षा पुन्हा घ्या असा आक्रोश केला जाऊन अनेकांनी याचिका दाखल केल्या. सीबीआय यासंदर्भात तपास करत असून त्यांनी १५५ विद्यार्थ्यांना या पेपर लीकचा फायदा झाल्याचे म्हटले आहे. अद्याप पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version