युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याच्या अडचणी आणखी वाढल्या असून सर्वोच्च न्यायालयाने त्याला दणका दिला आहे. रणवीर अलाहाबादियाने त्याच्या पासपोर्टची मागणी केली होती. मात्र, ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
रणवीर अलाहबादिया हा कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये केलेल्या त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आला आहे. टीकेच्या धनी झालेल्या रणवीरने या शोमध्ये एका स्पर्धकाला आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. यावरून देशभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी रणवीर अलाहाबादिया विरुद्ध अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. दरम्यान, रणवीर अलाहाबादियाने त्याच्या पासपोर्टची सर्वोच्च न्यायालयात मागणी केली होती. मात्र, ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितले की ते युट्यूबर रणवीर अलाहबादिया याच्या पासपोर्ट जारी करण्याच्या याचिकेवर दोन आठवड्यांनंतर विचार करेल. रणवीर अलाहाबादिया यांचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील अभिनव चंद्रचूड यांनी न्यायालयासमोर केलेल्या याचिकेत, त्यांचा पासपोर्ट जमा करण्याच्या अटीत बदल करण्याची मागणी केली होती, कारण त्यामुळे त्यांच्या कामावर परिणाम होत होता. वरिष्ठ वकिलांनी सांगितले की, अलाहबादिया याला वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेण्यासाठी परदेशात जावे लागत होते, ज्यामुळे अनेक बैठका घ्याव्या लागत होत्या. मात्र, यावर खंडपीठाने म्हटले आहे की, जर अलाहबादिया परदेशात गेला तर त्याचा तपासावर परिणाम होईल.
हे ही वाचा..
चिलीच्या राष्ट्राध्यक्षांना मोदींनी समजावला अशोक चक्राचा अर्थ!
पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचे, हे सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही!
वक्फवर चर्चा करण्यापेक्षा विरोधकांची पळापळ
धर्मांतरण करणारा पाद्री बजिंदरसिंग तुरुंगात आयुष्य काढणार!
सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला ३ मार्च रोजी त्याचे पॉडकास्ट आणि कार्यक्रम सोशल मीडियावर अपलोड करण्यास परवानगी दिली, परंतु हे पॉडकास्ट नैतिकता आणि सभ्यता राखेल आणि सर्व वयोगटांसाठी योग्य असेल अशी हमी सादर करण्याचे आदेश दिले. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमात रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला पालकांसंबंधी आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. यावरून गदारोळ माजला होता. रणवीर याने माफीही मागितली होती. यानंतर रणवीर अलाहाबादिया आणि कार्यक्रमाचा होस्ट समय रैनासह आदींवर पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.