तामिळनाडू सरकारचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या टिप्पणीवरून उदयनिधी स्टॅलिनसह ए राजा आणि अन्य १२ जणांना सुप्रीम कोर्टाकडून शुक्रवारी नोटीस बजावण्यात आली आहे.
उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माला डेंगू, मलेरिया अशी उपमा देत ” सनातन धर्माचे उच्चाटन करा” असे वक्तव्य केले होते. त्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात टीका करण्यात आली आणि एफआयआर दाखल करण्याची मागणी केली, या याचिकेवर न्यायालयाने नोटीस बजावली आहे . याचिकाकर्त्याने याचिकेत एकूण १४ पक्षांचा समावेश केला आहे. यामध्ये तामिळनाडू सरकारचे विविध विभाग, डीजीपी, पोलिस आयुक्त, सीबीआय आणि इतरांचा समावेश करण्यात आला आहे.न्यायालयाने तामिळनाडू सरकार, उदयनिधी स्टॅलिन, सीबीआय, ए राजा आणि इतर पक्षकारांना नोटीस बजावून त्यांचे उत्तर मागवले आहे.
हे ही वाचा:
राहुल गांधींचे परदेशात जाऊन भारतावर टीका करणे सुरूच..
इंडोनेशियाच्या शेल इको स्पर्धेत संघवी कॉलेजचे प्रतिनिधित्व करणार चिपळूणचा सुपुत्र
गॉडमदर लेडी डॉनला दरोड्याप्रकरणी मालाडमध्ये अटक
शरयू एक्स्प्रेसमध्ये महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करणारा चकमकीत ठार !
तथापि, सुप्रीम कोर्टाकडून हे प्रकरण द्वेषपूर्ण भाषणाशी जोडण्यास नकार दिला आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी २ सप्टेंबर रोजी सनातन धर्माची तुलना “डेंग्यू” आणि “मलेरिया” याच्याशी केली तसेच सनातन धर्मला केवळ विरोध न करता त्याचे “निर्मूलन” केले पाहिजे असे म्हटले होते.त्यानंतर सर्वत्र स्तरावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली.