कोरोनाकाळात देशभरात अनेकांना जीव गमवावे लागले. याच कोरोनाकाळात रुग्णालयांनीही चांगलेच हात धुवून घेतले. रुग्णालये म्हणजे पैसे छापण्याचा उद्योग आहे, अशी तिखट टीका सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. त्यामुळेच आता सर्वोच्च न्यायालयाने राज्यांनाच स्वतःची व्यवस्था उत्तम करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यांची व्यवस्था उत्तम असेल तर, सर्वसामान्य माणसाला खासगी रुग्णालयात जाण्याची गरजच भासणार नाही. त्यामुळे कोरोना उपचारासाठी खासगी रुग्णालयांपेक्षा राज्यांनी आता स्वतःची व्यवस्था उत्तम करण्याचे न्यायालयाने म्हटले.
देशभरातील महत्त्वाची रुग्णालये तसेच त्यांच्या सुरक्षेवरून सर्वोच्च न्यायालयाने खंत व्यक्त केली आहे. रुग्णालये पैसे छापण्याचा उद्योग बनला आहे, असे एका सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. त्यामुळेच हे छापखाने बंद करायला हवेत असेही यावेळी म्हटले. आता राज्यांनीच चांगली व्यवस्था साकारायला हवी असेही न्यायालय म्हणाले.
हे ही वाचा:
शिवाजी पार्कात अभिनेत्री सविता मालपेकरांची सोनसाखळी चोरली
राष्ट्रवादी, माकपचा न्यायालयात माफीनामा
पालिकेत हा कुठल्या ‘पेंग्विन गँग’चा भ्रष्टाचार सुरू आहे?
कुख्यात गँगस्टर बचकानाला ठोकल्या बेड्या
सध्या रुग्णालये देशातील सर्वात मोठा उद्योग बनली असल्याचे मत न्या. डी. वाय चंद्रचूड यांनी व्यक्त केले. सामान्यांच्या जिवाच्या बदल्यात आम्ही हे सगळे होऊ देणार नाही. अशी रुग्णालये बंदच व्हायला हवीत असे मत न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एम. आर शहा यांच्या खंडपीठाने मांडले.
मध्यंतरी ठाण्यातील एका रुग्णालयाचा गलथान कारभार असाच समोर आला होता. शहरातील अनेक रुग्णालये आजच्या घडीला रुग्णांकडून भरमसाठी पैसे आकारतात. अवाजवी बिले दिली जातात आणि त्यामुळे रुग्णांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर ताण येतोच.
रुग्णालये हा सगळा आता रिअल इस्टेटसारखा व्यवसाय झालेला आहे. तसेच आधीच ताण तणावात असलेल्या रुग्णांना दिलासा देण्याऐवजी रुग्णालये पैसा उकळत आहेत. तसेच रुग्णालये म्हणजे पैसे छापण्याचा उद्योग झालेला आहे, असे निरीक्षण न्यायालयाने प्रसंगी नोंदवले.