जर्मनीत ईव्हीएम वापरत नाहीत म्हणून भारतात का वापरू नये?

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी प्रशांत भूषण यांना विचारला सवाल

जर्मनीत ईव्हीएम वापरत नाहीत म्हणून भारतात का वापरू नये?

गेल्या काही वर्षात निवडणुकांमध्ये मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशिन्सवर शंका आणि संशय घेतला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल अर्थात व्हीव्हीपॅटमधून मिळणाऱ्या पावतीचीही मोजदाद करण्यात यावी अशी मागणी आता पुढे येऊ लागली असून व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमवरील मतदान यांची मोजदाद करून त्याद्वारे उमेदवाराचा निकाल घोषित करण्यात यावा अशी ही मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. पण त्यासंदर्भात मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना चांगलेच फैलावर घेतले.

न्यायाधीश संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांनी याबाबत वकील प्रशांत भूषण यांच्या युक्तिवादावर नाराजी व्यक्त केली. ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेच्या सहाय्याने मतदान व्हावे अशी त्यांची मागणी होती. पण संजीव खन्ना म्हणाले की, आपण आता वयाच्या साठीत आहोत. जेव्हा मतपत्रिका वापरल्या जात होत्या तेव्हाचा काळ आपल्याला अजूनही लक्षात आहे. कदाचित तुम्ही विसरले असाल पण आम्ही विसरलेलो नाही.

प्रशांत भूषण यांनी न्यायालयात सांगितले की, युरोपातील अनेक देशांनी ईव्हीएम मशिन्सऐवजी पुन्हा मतपत्रिकांकडे मोर्चा वळविला आहे. भूषण यांनी जर्मनीचे उदाहरण दिले. तेव्हा न्यायाधीशांनी त्यांना विचारले की, त्यांची लोकसंख्या किती. तेव्हा भूषण म्हणाले ५ कोटी.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे गटाचा मुंबईत होणार सुपडा साफ

आधी झालेले विसरा, म्हणजे नेमकं काय?

सलमानच्या पनवेल येथील फार्म हाऊसची देखील केली गेली होती रेकी

विजय माल्या, नीरव मोदी यांना लवकरच भारतात आणणार

तेव्हा न्यायाधीश दत्ता म्हणाले की, मी ज्या पश्चिम बंगाल राज्यातून येतो, त्यांची लोकसंख्या जर्मनीपेक्षा जास्त आहे. आपण कशावर तरी विश्वास ठेवला पाहिजे. अशा यंत्रणेला बाद ठरविणे योग्य नाही. जर मानवी पद्धतीने पुन्हा या यंत्रणेकडे वळलो तर अनेक समस्या निर्माण होतील.

दत्ता म्हणाले की, यंत्राच्या सहाय्याने अधिक अचूक निकाल येऊ शकतात. पण जर त्यासंदर्भात काही सूचना असतील तर सांगा. दत्ता म्हणाले की, भारत हा विशाल देश आहे आणि त्यामुळे इथे परदेशातील यंत्रणा कामी येणार नाहीत. तेव्हा विनाकारण यासाठी दुसऱ्या देशांची उदाहरणे देऊ नका.

 

Exit mobile version