‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल प्रसिद्धीच्या झोतात आलेला युट्यूबर आणि पॉडकास्ट होस्ट रणवीर अलाहबादिया याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ‘द रणवीर शो’ सुरू ठेवण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने युट्यूबर रणवीरला नैतिकता आणि सभ्यतेच्या अधीन राहून शो चालवण्यास परवानगी दिली आहे.
सुनावणीदरम्यान, न्यायालयाने टिप्पणी केली की २८० लोकांची रोजीरोटी या ‘शो’शी जोडलेली असल्याने ही सवलत देण्यात आली आहे. तसेच अलाहबादिया याने वापरलेल्या “शब्दांसाठी कोणताही बचाव” नाही असे खंडपीठाने नमूद केले आणि म्हटले, त्यांनाही हे कळले आहे आणि यासाठी पश्चात्ताप होईल अशी आशा आहे.
तथापि, सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादिया याला सध्या परदेश प्रवासाची अनुमती नाकारत त्याला तपासाला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सोशल मीडियावर सामग्री कोणती असावी या संदर्भात दिशा- निर्देश तयार करण्याच आदेश दिले आहेत. या संदर्भात समाजातील सर्व घटकांचा हितधारकांचा सल्ला घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.
हे ही वाचा :
तेजस्वी यादव यांची ५६ इंची जीभ, काय अपेक्षा करणार!
अबू आझमी यांना औरंग्याचा पुळका, म्हणाले चांगला प्रशासक होता!
महाकुंभ मेळा संपला पण संगमात स्नान करण्यासाठी भाविकांची ये-जा सुरूच!
दरम्यान, रणवीर अलाहाबादियाने कॉमेडियन आणि युट्यूबर समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये अश्लील कमेंट केल्या होत्या. त्यानंतर शोबद्दल बराच वाद निर्माण झाला होता आणि त्याच्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे रणवीर अलाहाबादियाला दिलासा मिळाला आहे.