उत्तर सापडले; म्हणून रजनीकांत योगी आदित्यनाथांचे पाया पडले

सुपरस्टारने दिले स्पष्टीकरण; या विषयावरून सोशल मीडियात सुरू होती चर्चा

उत्तर सापडले; म्हणून रजनीकांत योगी आदित्यनाथांचे पाया पडले

तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या पायाला स्पर्श केला. यावरून काहींनी रजनीकांत यांच्यावर टीकाही केली. स्वत: रजनीकांत हे वयाने योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा मोठे असल्याने त्यांना तसे काही करण्याची गरज नव्हती, असेही काहींनी बोलून दाखवले.

 

त्याबाबत रजनीकांत यांनी स्वत:ची बाजू मांडली आहे. ‘मला संन्यासी आणि योगींच्या पायांना स्पर्श करण्याची सवय आहे,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनऊमध्ये भेट घेऊन त्यांना चरणस्पर्श केला. याचे स्पष्टीकरण त्यांनी सोमवारी दिले. ‘मला संन्यासी आणि योगी असणाऱ्या व्यक्तींच्या पायाला स्पर्श करण्याची सवय आहे. ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, हे मला माहीत आहे. मात्र मी नेहमीच अशा व्यक्तींना चरणस्पर्श करतो,’ असे स्पष्टीकरण रजनीकांत यांनी चेन्नई विमानतळावर दिले.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री शिंदे रात्री अचानक केईएम रुग्णालयात अवतरले

चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर संध्याकाळीच का उतरणार?

आता कार्लसनला चितपट करण्यासाठी प्रज्ञानंद झाला सज्ज

पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरसह एका दहशतवाद्याचा खात्मा

संन्यासी असलेले योगी आदित्यनाथ यांना २०१४ मध्ये गोरखनाथ मंदिराचे मुख्य पुजारी बनवण्यात आले होते. रजनीकांत यांनी शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्या दिवशीनंतर, लखनऊमध्ये ‘जेलर’ चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित होते.

 

 

दुसऱ्या दिवशी त्यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यादव यांनी त्यांच्या भेटीचे एक ट्विट शेअर केले आहे, ज्यामध्ये त्यांचा मिठी मारतानाचे छायाचित्र आहे. रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट १० ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून जगभरातील बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत त्याने ५०० कोटींची कमाई केली आहे.

Exit mobile version