साऊदम्पटनमध्ये सूर्याचं दर्शन, मॅचची वेळ बदलली

साऊदम्पटनमध्ये सूर्याचं दर्शन, मॅचची वेळ बदलली

भारत आणि न्‍यूझीलंड यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपच्या अंतिम सामन्याचा पहिला दिवस पावसाने खराब केला. शुक्रवारी सकाळपासूनच साऊदम्पटनमध्ये पावसाची रिमझिम सुरु होती. यामुळे नाणेफेकदेखील झाली नाही. मैदानावरील पंचांनी वेळोवेळी खेळपट्टी खेळण्यासाठी योग्य आहे का, याची पाहणी केली. दरम्यान आज मात्र साऊदम्पटनमधील वातावरण परिस्थितीबाबत एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. कॉमेन्ट्रीसाठी तिथे उपस्थित असलेल्या दिनेश कार्तिकने मैदानाचे फोटो शेअर केले आहेत.

पहिल्या दिवशीचा खेळ रद्द झाल्यामुळे खेळाडूंसह सर्वच क्रिकेट रसिकांचा हिरमोड झाला. त्यामुळे दुसऱ्यादिवशी म्हणजे आजतरी सामना होतोका याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. दरम्यान कार्तिकने शेअर केलेल्या फोटोमध्ये मैदानावर चांगल ऊन पडलं असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे असेच वातावरण राहिल्यास या बहुप्रतीक्षीत सामन्याला नक्की सुरुवात होईल.

हे ही वाचा:

आता मुंबईकर मतदार शिवसेनेला धडा शिकवेल

कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट

१२ ते १८ वयोगटातील मुलांसाठीही लवकरच लस येणार?

मुंबईत निर्बंध शिथील करा, व्यापाऱ्यांची ठाकरे सरकारकडे मागणी

पहिल्या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अर्धा तास आधी म्हणजेच भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सुरु केला जाईल. तसेच पावसाने पुन्हा खोडा न घातल्यास संपूर्ण ९८ ओव्हरचा खेळ खेळवला जाईल. तसेच पावासाने पुन्हा व्यत्यय आणल्यास ६० ते ७० ओव्हरचा खेळही खेळवला जाऊ शकतो. मात्र इंग्लडच्या हवामानाबाबत कोणतीही पुष्टी केली जाऊ शकत नसल्याने वातावरण कधीही बदलण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. जी काही परिस्थिती आहे ती पुढील काही तासांतच स्पष्ट होईल.

Exit mobile version