आयसीसीचा ‘सूर्या’नमस्कार; सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

आससीसी पुरुष क्रिकेटप्टू ऑफ द इयर २०२२ चा पुरस्कार

आयसीसीचा ‘सूर्या’नमस्कार; सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

भारतीय क्रिकेट संघाचा ३६० फलंदाज सूर्यकुमार यादवचा दबदबा वाढतोय. टीम इंडियासाठी अनेक सामन्यात त्याने तुफानी फटकेबाजी करत सर्वांची मने जिंकली आहेत. २०२२ हे कॅलेंडर वर्ष सूर्यासाठी लाभदायक ठरलेय. त्याने २०२२ मध्ये ११६४ धावा कुटून काढल्या.

याच कामगिरीबद्दल आयसीसीने त्याला विशेष बक्षीस देऊन गौरविले आहे. सूर्यकुमारची आयसीसीने २०२२ सालच्या पुरुष टी२० क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड केली आहे. बीसीसीआयनेही सूर्यकुमारचे विशेष ट्वीट करून अभिनंदन केले आहे.

सूर्यकुमार यादव २०२२ मध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाची पिसे काढून त्यांना पळताभुई केले. आक्रमक फटके मारून मैदानाच्या चारही बाजूंना त्याने फटकेबाजी करत धावांचा पाऊस पाडला. त्याच्या विशेष फटक्यांनी क्रिकेट रसिकांचे डोळे विस्फारून गेले. सूर्या टी२० मध्ये जगातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याच्या या कामगिरीलाही आयसीसीने गौरविले आहे. सूर्यकुमारला आससीसी पुरुष क्रिकेटपटू ऑफ द इयर २०२२ चा पुरस्कार मिळाला आहे. सूर्याने १८७.४३ च्या स्ट्राइक रेटने धावा चोपून काढल्या. २०२२ मध्ये  वर्षात मिस्टर ३६० सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.

हेही वाचा :

“माईंड रीडर सुहानी शाह यांच्यापेक्षा मी करतो ते वेगळं आहे,

शिवाजी पार्क परिसर उद्या ‘नो-फ्लाय झोन’ घोषित

मंत्रिमंडळ विस्तारावर फडणवीस यांनी दिलं हे उत्तर

सदावर्तेना नागपूर, आरएसएस, फडणवीस यांच्याबद्दल विचारणा

सूर्याने १०० पेक्षा जास्त धावा टी२० मध्ये केल्या. एका कॅलेंडर वर्षात १००० पेक्षा जास्त टी२० धावा करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला. त्यात त्याने ६८ गगनचुंबी षटकार मारले. हाही एक मोठा विक्रम होता. या विशेष कामगिरीमुळे सूर्याची आयसीसी पुरुषांचा टी२० प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली. आयसीसीने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

बीसीसीआय़नेही सूर्याचे अभिनंदन केले आहे. सूर्याचा फोटो ट्वीट करून तो शेअर केला आहे. आयसीसी पुरुष टी२० क्रिकेटर क्रिकेटर ऑफ द इयर बनल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे. बीसीसीआयने सूर्याचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या दमदार कामगिरीची झलक क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतेय.  सूर्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत ४५ टी२० सामने खेळलेत. त्यात त्याने १५७८ धावा झोडपल्यात. यात ३ शतके आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. टी२०मधील सर्वोत्तम धावसंख्या ११७ धावा. सूर्यकुमार यादव सध्याच्या घडीला टी२० मध्ये जगातील नंबर वन फलंदाज आहे.

Exit mobile version