यूपी: कॉन्स्टेबल भरती देण्यास निघाली ‘सनी लिओनी’!

ॲडमिट कार्ड सोशल मीडियावर व्हायरल

यूपी: कॉन्स्टेबल भरती देण्यास निघाली ‘सनी लिओनी’!

अभिनेत्री सनी लिओनी आपल्या बोल्ड अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते.मात्र, आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.अभिनेत्री सनी लिओनी चक्क पोलीस भरती देण्यास निघाली आहे.उत्तर प्रदेश पोलीस भरती परीक्षेसाठी सनी लिओनीचे हॉल तिकीट देखील निघाले आहे.कन्नौजच्या तिरवा येथील श्रीमती सोनश्री मेमोरियल गर्ल्स कॉलेज हे परीक्षा केंद्र आले होते.

उत्तर प्रदेश पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा शनिवारपासून सुरू झाली आहे.तब्बल पोलीस कॉन्स्टेबलच्या ६०,२४४ पदांसाठी ही भरती होत आहे.या भरतीसाठी उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यातील तरुण-तरुणी मैदानात उतरले आहेत.मात्र, या पोलीस भरतीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी देखील मैदानात उतरली आहे.वास्तविक, कन्नौजमधील पोलीस भरती परीक्षेचे प्रवेशपत्र सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रवेशपत्रावर सनी लिओनीचा फोटो असून तिचे नावही लिहिले आहे. मात्र, परीक्षेच्या नियोजित तारखेला हे प्रवेशपत्र घेऊन पेपर देण्यासाठी कोणीही आले नाही. ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली आहे. हा कोणाचा तरी खोडसाळपणा असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

गृहनिर्माण संस्थांच्या विविध प्रश्नांसाठी सोमवारी राष्ट्रीय अधिवेशन

आसाममधील अमृतपाल सिंगच्या कोठडीत स्पायकॅम पेन, फोन!

‘सीता’ सिंहीण आणि ‘अकबर’सिंहाच्या एकत्र राहण्यास विरोध!

गीतकार गुलजार आणि जगद् गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार!

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवस दोन शिफ्टमध्ये कॉन्स्टेबल भरतीची परीक्षा घेतली जात आहे.१७ फेब्रुवार शनिवार रोजी परीक्षेचा पहिला दिवस होता.दरम्यान, पहिल्या शिफ्टच्या परीक्षेपूर्वी कन्नौजच्या तिरवा येथील सोनश्री स्मारक बालिका महाविद्यालयात परीक्षेसाठी पाठवण्यात आलेल्या यादीमध्ये अभिनेत्री सनी लिओनीचे नाव पाहून धक्का बसला.या यादीत केवळ नावच नाही तर अभिनेत्रीच्या फोटोचाही समावेश होता.तसेच स्वाक्षरीच्या जागी सनी लिओनीचा फोटो लावण्यात आला होता.हा प्रकार पाहून अधिकारी आणि महाविद्यालय प्रशासन आश्चर्यचकित झाले. याची माहिती संबंधितांना देण्यात आली.

यानंतर प्रशासनाने या प्रवेशपत्रासह पेपर देण्यासाठी कोण येते हे पाहण्याचा प्रयत्न केला. परीक्षा पार पडली पण हे प्रवेशपत्र घेऊन पेपर द्यायला कोणीही आले नाही. यानंतर सनी लिओनीचा फोटो असलेले हे प्रवेशपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले.दरम्यान, हा कोणाचा तरी खोडसाळपणा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.मात्र, सनी लिओनीचे हे परीक्षेचे ॲडमिट कार्ड सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Exit mobile version