बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनीने नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.सनी लिओनीने टाकलेल्या पोस्टमध्ये एका ९ वर्षीय मुलीचा फोटो आहे.पोस्ट करण्यात आलेली मुलगी बेपत्ता असल्याचे तिने सांगितले आहे.या मुलीचा जो किणी शोध घेऊन आणेल त्याला स्वतः सनी ५०,००० रुपये देणार असल्याचे तिने सांगितले आहे.सनीच्या या पोस्टमुळे सर्वजण चकित झाले आहेत.
अनुष्का किरण मोरे असे बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव आहे. मुलीचे वय ९ वर्ष आहे.यामुलीला शोधून आणाऱ्यास विशेष रक्कम देण्याचे आश्वासन सनीने केले आहे.अनुष्का ही सनीच्या मुंबईच्या घरात घरकाम करणाऱ्या महिलेचे मुलगी असल्याचे सनीनेच सांगितले आहे.सनीच्या पोस्टमध्ये बेपत्ता अनुष्काची सर्व माहिती दिली आहे.ज्यावर तिचे नाव, पालकांची माहिती, घरचा पत्ता आणि फोननंबर अशी सर्व महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.ही पोस्ट शेअर करताना सनीने म्हटले आहे की, “या मुलीला तिच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत आणण्यासाठी मी वैयक्तिकरित्या आणखी ५०००० रुपये देईन.” त्यानंतर अभिनेत्रीने मुंबई पोलिस आणि महिला मंगल यांनाही या पोस्टमध्ये टॅग केले.
हे ही वाचा:
अमेरिकन गायिका मिलबेनने नीतिशकुमारना सुनावले!
बिहारमध्ये आता ६५ टक्के आरक्षण!
मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा आहे का? म्हणत मराठा तरुणाची आत्महत्या
बीएमडब्ल्यू हॉटेलमध्ये घुसली, ऑस्ट्रेलियातील पाच भारतीय वंशाचे नागरीक मृत
सनी पुढे म्हणते “ही माझ्या घरातील घरकाम करणाऱ्या महिलेची मुलगी आहे. जोगेश्वरी पश्चिम बेहराम बाग येथून ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासूनती बेपत्ता आहे, ती ९ वर्षांची आहे, तिचे आईवडील तिला शोधत आहेत, कृपया तिची आई सरिता हिच्याशी संपर्क साधा : + ९१ ८८५०६०५६३२ किरण वडील: +९१ ८२३७६३१३६० किंवा थेट माझ्याशी संपर्क साधला तरी चालेल.”सनीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता या पोस्टवर अभिनेत्रीचे चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.सनीच्या या पोस्टमुळे तिचे चाहते तिचे कौतुक करत आहेत.