१९ मार्चपूर्वी सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत येण्याची शक्यता नाहीच

नासाने दिली माहिती; स्पेसएक्स क्रू- 10, १४ मार्च रोजी प्रक्षेपित करण्याचे अपेक्षित

१९ मार्चपूर्वी सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत येण्याची शक्यता नाहीच

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) अडकून पडले आहेत. नऊ महिन्यांपासून अडकून पडलेल्या या दोन अंतराळवीरांना पुन्हा परत पृथ्वीवर आणण्यासाठी नासाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी क्रू-10 हे यान लाँच होणार होते. मात्र, काही तांत्रित अडचणींमुळे ही मोहिम थांबवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा मुक्काम वाढला आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून अंतराळवीर पृथ्वीवर कधी परतणार यावर आता नासाने भाष्य केले आहे. नऊ महिन्यांपासून अडकलेले भारतीय वंशाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर १९ मार्चपूर्वी पृथ्वीवर परतणार नाहीत, अशी पुष्टी नासाने केली आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर जूनपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आहेत. या दोघांनीही जून २०२४ मध्ये आठ दिवसांच्या मोहिमेसाठी आयएसएसमध्ये प्रवेश केला होता. परंतु, बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातील तांत्रिक समस्यांमुळे त्यांचा प्रवास बराच लांबला.

नासाचे क्रू मिशन, स्पेसएक्स क्रू- 10, १४ मार्च रोजी संध्याकाळी ७:०३ वाजता फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित करण्याचे अपेक्षित आहे. या मोहिमेत सुनीता आणि बुच यांची जागा घेण्यासाठी नासाच्या अ‍ॅन मॅकक्लेन आणि निकोल आयर्स, जॅक्सा अंतराळवीर ताकुया ओनिशी आणि रोसकॉसमॉस अंतराळवीर किरिल पेस्कोव्ह हे चार अंतराळवीर पाठवले जातील. परंतु, प्रक्षेपण मार्गावर जोरदार वारे आणि पर्जन्यवृष्टीमुळे त्यांना मोहीम पुढे ढकलावी लागली. नासाने आता अहवाल दिला आहे की, प्रक्षेपणाची परिस्थिती अत्यंत अनुकूल आहे, अनुकूल हवामानाची शक्यता ९५% पेक्षा जास्त आहे. तर, प्रक्षेपण १५ किंवा १६ मार्चपर्यंत पुढे ढकलल्यास प्रतिकूल परिस्थितीची शक्यता ५०-६०% आहे असा अंदाज वर्तवला आहे.

हे ही वाचा : 

देशभरात होळीचा उत्साह, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा!

पॅलेस्टिनी समर्थक निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

दिल्ली कॅपिटल्सची धुरा अक्षर पटेलच्या हाती

भारताने उपटले पाकिस्तानचे कान!

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अंतराळ स्थानकावरून परत आणण्यासाठी नासा सतत प्रयत्न करत आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या जागी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात चार अंतराळवीर पाठवण्याची नासाची योजना आहे. क्रू-10 मध्ये चार सदस्यांचा समावेश आहे. यातील अंतराळवीर हे दोन अमेरिकन अंतराळवीर, एक जपान आणि एक रशियाचे आहेत.

खोक्या-बोक्याना अभय देणाऱ्याचं कंबरड मोडा! | Amit Kale | Beed | Devendra Fadnavis | Valmik Karad |

Exit mobile version