भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) अडकून पडले आहेत. नऊ महिन्यांपासून अडकून पडलेल्या या दोन अंतराळवीरांना पुन्हा परत पृथ्वीवर आणण्यासाठी नासाकडून प्रयत्न केले जात असतानाचं आता क्रू-10 मोहिमेतील अंतराळवीर अंतराळ स्थानकात पोहचल्याची माहिती समोर आली आहे.
रविवारी सकाळी नासाच्या बदली पथकाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात यशस्वीरित्या प्रवेश केला. यामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या अंतराळवीरांच्या बहुप्रतिक्षित परतीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयानातून सुरू केलेले क्रू-10 मिशन, क्रू-9 अंतराळवीरांच्या प्रस्थानाची सोय करण्याच्या उद्देशाने तयार केल्यानुसार आयएसएसवर पोहोचले. चार सदस्यांच्या क्रू-10 टीममध्ये नासाच्या अंतराळवीर अॅन मॅकक्लेन, निकोल आयर्स, जपानचे ताकुया ओनिशी आणि रशियाचे किरिल पेस्कोव्ह यांचा समावेश आहे. गेल्या जूनपासून मोहिमेमध्ये अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची जागा घेण्यासाठी हे पथक अंतराळ स्थानकात पोहचले आहे.
VIDEO | Crew-10 team – which includes NASA's Anne McClain and Nichole Ayers, Japan Aerospace Exploration Agency's Takuya Onishi and Roscosmos cosmonaut Kirill Peskov – arrives at International Space Station. The Crew-10 team will replace astronauts Sunita Williams and Barry… pic.twitter.com/sHr0FXmZIA
— Press Trust of India (@PTI_News) March 16, 2025
अंतराळवीरांचा दीर्घकाळचा मुक्काम हा अमेरिकेत राजकीय विषय बनला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी या विलंबावर लक्ष केंद्रित केले. दोघांनीही जाहीरपणे मोहिमेला गती देण्यासाठी वचनबद्धता दर्शविली. ट्रम्प यांनी नासाच्या कामकाजातील अडचणींसाठी मागील प्रशासनाला जबाबदार धरले.
हे ही वाचा :
न्यायालयाच्या आदेशानंतर संभल येथील जामा मशिदीच्या रंगकामाला सुरुवात
भाजपकडून विधान परिषदेसाठी तीन उमेदवार
सोने तस्करी प्रकरण: रान्या रावचे सावत्र वडील सक्तीच्या रजेवर
हौथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करत ट्रम्प यांचा इशारा; हल्ला केला तर अवस्था नरकापेक्षाही वाईट होईल
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अंतराळ स्थानकावरून परत आणण्यासाठी नासा सतत प्रयत्न करत होती. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या जागी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात चार अंतराळवीर पाठवण्याची नासाची योजना होती. क्रू-10 मध्ये चार सदस्यांचा समावेश आहे. यातील अंतराळवीर हे दोन अमेरिकन अंतराळवीर, एक जपान आणि एक रशियाचे आहेत. त्यांचेही यापूर्वीचे उड्डाण तांत्रिक समस्यांमुळे स्थगित झाले होते. अखेर हे अंतराळवीरांचे पथक अंतराळ स्थानकात पोहचले आहे.