वीर सावरकरांवर निष्ठा असलेले सुनील वालावलकर यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले. त्यांना काही आरोग्याचे समस्या होत्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अधिकारी व सदस्यांना दु:ख झाले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर यांनी वालावलकर कुटुंबीयांच्या प्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. सुनील वालावलकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर भावूक झाले आहेत. ते म्हणाले, सुनील वालावलकर म्हणून मी एक जुना मित्र गमावला आहे. व्यक्तिशः ते कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एक निष्ठावंत अनुयायालाही आपण मुकलो आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची मोठी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो असे, म्हणत आपण जुना मित्र गमावल्याचे रणजित म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेकडून अल्टिमेटम
नवाब मलिकांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध
कीर्तीचक्र विजेते नायब सुभेदार संतोष राळे यांना स्वा. सावरकर शौर्य पुरस्कार
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित ‘मृत्युंजय’ हे नाटक शाळा, महाविद्यालये, महाविद्यालयांमध्ये यावे यासाठी सुनील वालावलकर यांनी खूप परिश्रम घेतले. हे नाटक देशाच्या सर्व भागात पोहोचावे हा त्यांचा उद्देश होता. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने या प्रयत्नासाठी सर्व संसाधने उपलब्ध करून दिली, त्यामुळे हे नाटक लाखो विद्यार्थी आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले.