काँग्रेसने राजस्थानमधील जयपूर मतदारसंघातून सुनील शर्मा यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर गदारोळ झाला होता. त्यामुळे त्यांची उमेदवारी मागे घेण्याची वेळ काँग्रेसवर आली. मात्र यामुळे शर्मा नाराज झाले असून आपली बाजू समर्थपणे न मांडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काँग्रेसने सुनील शर्मा यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र सुनील शर्मा हे ‘द जयपूर डायलॉग’ या उजव्या विचारसरणीच्या फोरमशी संबंधित असल्याचा आरोप झाला. त्यांच्याकडून सातत्याने काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांवर टीका झाली आहे. त्यामुळे शर्मा यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसवर टीकेची झोड उठली. त्यानंत तातडीने जयपूरची उमेदवारी प्रताप सिंह खाचरियावास यांना देण्यात आली.
हे ही वाचा:
भाजपने वरुण गांधी यांचे नाव वगळले; आई मनेका गांधी यांची जागा कायम!
अभिनेत्री कंगना रणौत, अरुण गोविल भाजपच्या पाचव्या यादीत!
अरविंद केजरीवाल यांना जनपाठिंबा दाखवण्यासाठी वापरले जगन्नाथ पुरीमधील जुन्या रथयात्रेचे छायाचित्र
नरेंद्र मोदींना मत द्या हीच लग्नाची भेट; तेलंगणातील लग्नपत्रिका व्हायरल
मात्र सुनील शर्मा आपली निराशा लपवू शकले नाहीत. ‘पक्षाने माझी बाजू न मांडल्यामुळे मी दुखावलो गेलो आहे. ज्यांनी माझ्याविरुद्ध कट रचला, ते जिंकले,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, त्यांनी स्वतःहून निवडणुकीतून माघार घेतल्याचे आणि काँग्रेस सोडून जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, शर्मा यांनी जयपूर डायलॉग्जशी असलेल्या संबंधाबाबतही भाष्य केले. मी तेथे पक्षाची भूमिका मांडण्यासाठी गेलो होतो, असे त्यांनी सांगितले. सुनील शर्मा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसनेते शशी थरूर यांनी जाहीरपणे टीका केली होती. मात्र मी काँग्रेस पक्षाशी किती बांधील आहे, हे संपूर्ण देश ओळखून आहे, असे सुनील शर्मा म्हणाले.