…. म्हणून आयपीएलमध्ये युवा खेळाडूंसाठी एक कोटीची मर्यादा घाला

…. म्हणून आयपीएलमध्ये युवा खेळाडूंसाठी एक कोटीची मर्यादा घाला

सध्या टाटा आयपीएल मेगा ऑक्शन सुरू असून अनेक युवा खेळाडूंवर मोठी बोली लागली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी याबाबत आपले मत मांडले आहे. आयपीएलमधील अनकॅप्ड म्हणजेच अद्याप भारतीय संघात स्थान न मिळवू शकलेले खेळाडू अशा भारतीय क्रिकेटपटूंचा पगार जास्तीत जास्त एक कोटी रुपयांपर्यंत मर्यादित असावा, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

सुनील गावस्कर यांच्या मते सहज मिळालेला पैसा हा नवोदित खेळाडूंना बिघडवू शकतो. तसेच त्यांना अधिक चांगली कामगिरी करण्याची मेहनत करण्यापासून रोखू शकतो. दोन दिवसांपूर्वी सुनील गावस्कर यांनी ‘मिड-डे’ मध्ये लिहिले की, “मेगा लिलाव आठवड्याच्या शेवटी होईल आणि आमचे काही अंडर- १९ संघातील खेळाडू अगदी काही क्षणात करोडपती होतील. १९ वर्षांखालील स्तरावर चांगली कामगिरी केल्याने आयपीएल किंवा अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही यशाची हमी मिळत नाही. सर्व स्तरांमध्ये खूप मोठा फरक आहे.”

“बरेच जण या अधिकच्या मिळालेल्या पैशांमध्ये वाहून जातात आणि लक्ष्य गमावून बसतात. खेळाच्या बाहेर जातात. अनकॅप्ड खेळाडूंसाठी एक कोटी रुपयांची मर्यादा घातली तर त्यांना हे लक्षात येईल की, आणखी पुढे जाण्यासाठी आणि अधिक कमाई करण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागेल. सहज मिळालेल्या पैशाने अनेक खेळाडूंचा खेळ खराब होऊ शकतो,” असेही सुनील गावस्कर म्हणाले.

यंदा लिलावासाठी एकूण ५९० खेळाडूंपैकी ३५५ अनकॅप्ड खेळाडू आहेत. हे सर्व विकले जाणार नाहीत. फ्रँचायझीला देखील कोणाला विकत घ्यायचे हे त्यांना माहीत आहे. मुंबई इंडियन्सला ईशान किशन संघात हवा असल्याने पहिली खरेदी करण्यासाठी अर्ध्याहून अधिक दिवस फ्रँचायझीने वाट पाहिली.

हे ही वाचा:

एबीजी शिपयार्डचा २२ हजार कोटींचा घोटाळा

‘मला तुमच्या राज्यात जगण्याची इच्छा राहिलेली नाही’

चक्क ‘पुष्पा’ मुळे पकडले गेले चोर….

…. म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाने दिली टेबल टेनिस फेडरेशनच्या कामकाजाला स्थगिती

दरम्यान मोहम्मद सिराज, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर अशा काही खेळाडूंनी आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीची चमक दाखवली आणि भारतीय संघात स्थान मिळवले. त्यांची मेहनत करण्याची तयारी होती आणि ती त्यांनी केली, असेही सुनील गावस्कर म्हणाले. तसेच ऑक्शनमध्ये अनेक नवख्या खेळाडूंवर करोडोंची बोली लागली. त्यामुळे त्यांचे कौशल्य वाया जाऊ शकते अशी भीती सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version