सुनील गावस्करांनी राजदीप सरदेसाईला दाखविली त्याची जागा

सुनील गावस्करांनी राजदीप सरदेसाईला दाखविली त्याची जागा

१४ डिसेंबर रोजी, इंडिया टुडेवर क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील कथित भांडणाची चर्चा दिवसभर रंगत होती. त्यावेळी माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर पॅनेलचे सदस्य होते. चर्चेदरम्यान,गावसकरांनी राजदीप सरदेसाई याला त्याची जागा दाखवून दिली.

इंडिया टुडे वर क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील कथित भांडणाच्या चर्चेदरम्यान अँकर राहुल कँवलने, जय शाह आणि सौरव गांगुलीने ही परिस्थिती कशी हाताळावी असे गावस्करांना विचारले. त्यावर गावसकरांनी, त्या दोघांनी दुर्लक्ष करावे. ते पुढे हेही म्हणाले की, ही केवळ अफवा असू शकते कारण याबद्दल कोणीही अधिकृत माहिती दिलेला नाही. दोन्ही खेळाडूंनी याबाबत काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे कोणीही या वादाला उत्तर न दिलेलेच बरे.
गावस्करांच्या या उत्तरावर सरदेसाई म्हणाले की, मी त्यांच्याशी सहमत नाही. त्यावर गावसकर सरदेसाईला म्हणाले, “राजदीप तू माझ्याशी सहमत नसशील तरी मला फरक पडत नाही.’
असं अपमानित होऊन पुन्हा लाइव्ह टीव्हीवर राजदीप हसण्याशिवाय काहीच करू शकला नाही.

संभाषणादरम्यान राजदीपला अपमानित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मार्च २०१७ मध्ये, इंडिया टुडे कॉन्क्लेव्हने बिझनेस टायकून मुकेश अंबानी यांच्यासोबत राजदीप सरदेसाई यांची सहा मिनिटांची मुलाखत प्रकाशित केली होती. सरदेसाई यांनी त्यांची ओळख देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून करून दिली. जेव्हा त्यांनी अंबानींना विचारले की, तुमची अशा प्रकारे ओळख करून दिली तेव्हा तुम्हाला कसे वाटले, त्यावर अंबानी म्हणाले, “माझा यावर विश्वास नाही. मी तुला गांभीर्याने घेत नाही.” ‘सर्वात ताकदवान व्यक्ती’ कडून अपमानित झालेले सरदेसाई एवढेच म्हणू शकले, ” ये क्या बात हुई .”

त्याच वर्षी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर त्यांनी राजदीप सरदेसाई यांना त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी मुलाखत दिली होती. मुलाखती दरम्यान सरदेसाई माजी राष्ट्रपती बोलत असताना मध्ये बोलत राहिले. त्यावर मुखर्जी म्हणाले, “मला माझं बोलण पूर्ण करू दे. तुम्ही माजी राष्ट्रपतींची मुलाखत घेत आहात याची आठवण करून देताना मला वाईट वाटत आहे. कृपया सौजन्य बाळगा. व्यत्यय आणू नका.”

हे ही वाचा:

आपला हक्क आता हिसकावून घ्यावा लागेल

दर शुक्रवारी आर्यन खानला हजर राहण्याची गरज नाही!

‘दोन वर्षांत राज्य सरकारने न्यायालयाच्या आदेशांचे पालन का केले नाही?’

राज्यातील निवडणूका होणार OBC आरक्षणाशिवाय

 

जानेवारी २०१६ मध्येही एकदा बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन यांच्या मुलाखतीदरम्यान, राजदीपने त्यांना देशातील कथित असहिष्णुतेबद्दलच्या त्यांच्या मतांबद्दल प्रश्न केला. बच्चन यांनी त्याच्याच प्रश्न त्याच्यावरच उलटवला होता. जुलै २०१६ मध्ये, सरदेसाईने टेनिसपटू सानिया मिर्झाच्या एका मुलाखतीदरम्यान, तिच्या मातृत्वाविषयी, कारकिर्दीविषयी प्रश्न तिला केले होते.त्यावेळी सानियानेही त्याला पलटवार केले होते. एवढ्यावरच त्याचा अपमान थांबला नाही तर, २००७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सरदेसाई यांना चांगलेच फैलावर घेतले.

Exit mobile version