सुनील गावसकरांनी हटके अंदाजात साजरा केला नीरजचा विजय

सुनील गावसकरांनी हटके अंदाजात साजरा केला नीरजचा विजय

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भालाफेक या क्रीडा प्रकारात भारताचा खेळाडू नीरज चोप्रा याने सुवर्ण पदक पटकावले. नीरजच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक आहे. समस्त भारतवर्षाने आज नीरजच्या या कामगिरीसाठी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी वेगवेगळ्या प्रकारे लोक आपल्या भावना व्यक्त करताना दिसले.

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी देखील अनोख्या अंदाजात नीरज चोप्राचा विजय साजरा केला आहे. सध्या एकीकडे टोकियो ऑलिम्पिक २०२० सुरु असतानाच भारतीय क्रिकेट संघ हा इंग्लंड सोबत कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना सध्या सुरु आहे. या सामन्यासाठी समालोचन करणाऱ्या चमूमध्ये सुनील गावसकर यांचा समावेश आहे.

नीरज चोप्राची ऑलिम्पिकची अंतिम फेरी सुरु होती तेव्हा भारतीय समालोचकांचा चमू टीव्हीवर संपूर्ण खेळ बघत होता. भारताच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीचे साक्षीदार होण्यासाठी हे सारेच उत्सुक होते. नीरजने औपचारिकता म्हणून अंतिम भाला फेकला आणि सारेच जल्लोष करू लागले. भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा हा तर चक्क नाचू लागला.

हे ही वाचा:

नव्या युतीच्या फुसकुल्या

कळवा येथे घरांवर कोसळली दरड

जम्मू- काश्मिरमध्ये अनेक ठिकाणी एनआयएची छापेमारी

जेष्ठ संघ प्रचारकांचा सन्मान…टपाल खात्याने प्रकाशित केले टपाल तिकीट

नीरजचे यश बघून सुनील गावसकर हे उभे राहून टाळ्या वाजवू लागले. तर त्यानंतर चक्क ते गाणं गाऊ लागले. ‘मेरे देश कि धरती सोना उगले, उगले हिरे मोती’ हे दिलीप कुमार यांच्या उपकार चित्रपटतील गाणे सुनील गावसकर यांच्या ओठी आले. बहुदा नीरज चोप्रा हा आपल्या देशाने तयार केलेला हिरा आहे म्हणूनच आपसूक गावसकरांच्या ओठी हे गाणे आले असावे.

गावसकरांच्या या हटके आनंद सोहळ्याचा व्हिडीओ सध्या व्हॅट्सऍप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अशा सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल झाला आहे.

Exit mobile version