आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर ४ चे सामने कोलंबो इथेच ठेवण्यामागील नेमके कारण काय, असा सवाल भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी उपस्थित केला आहे. हंबनटोटा येथे पाऊस नसताना तिथे हे सामने का हलवले जात नाहीत, तो जिथे पुढील आठवडाभर पाऊस आहे, अशा कोलंबोत ठेवण्यामागील कारण काय, असा प्रश्न गावस्कर यांना पडला आहे.
आशिया चषक स्पर्धेचे नियोजन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आहे. त्यानुसार भारत पाकिस्तानात खेळू शकत नसल्याने भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होत आहेत. पण कोलंबोत पावसाने सामन्यांवर पाणी फेरले जात असले तरी सामन्यांचे आयोजन कोलंबोतच केले जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुढील आठवडाभर कोलंबोत मुसळधार पाऊस कोसळणार आहे, असे म्हटले जात असतानाही हंबनटोटा येथे सामने आयोजित केले जात नाहीत. त्यामुळे यामागील रहस्य नेमके काय आहे, याचे कुतुहल गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.
गावस्कर यांनी म्हटले आहे की, कुणीतरी यामागील खरी बातमी बाहेर काढली पाहिजे. क्रिकेटच्या दृष्टिकोनातून विचार केला तर खेळाडूंना हंबनटोटा येथे जाण्याची इच्छा नाही. त्यामुळे प्रशासकांनी हंबनटोटाहून अखेरच्या क्षणी हे सामने हंबनटोटाहून कोलंबोला हलविले आहेत. अर्थात, कोलंबोत पाऊस असतानाही हे सामने तिथे हलविले आहेत.
गावस्कर यांनी प्रशासकांना दोष मात्र दिलेला नाही. ते त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत सांगतात की, हवामानातील बदलामुळे प्रेक्षकांना दर्जेदार क्रिकेटपासून मुकावे लागते आहे. पण त्यांना त्याबद्दल बळीचा बकरा बनवता येणार नाही. कोलंबो येथील हवामान अनुकूल नाही हे माहीत असूनही व्यवस्थापनाने सामन्यांचे आयोजन हंबनटोटा येथे का केलेले नाही, हा मात्र प्रश्न आहे.
हे ही वाचा:
जी- २० साठी परदेशी पाहुणे राजधानीत अवतरले
राज्यात गडगडाटासह पावसाचे जोरदार कमबॅक
आताच पाहा, नाहीतर निशिमुरा धुमकेतू दिसणार थेट ४०० वर्षांनंतर
काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी मोदींचे पोस्टर्स शेअर केले; नंतर कळले चूक झाली!
भारत आणि पाकिस्तान यांच्यात १० सप्टेंबरला सामना होत आहे. स्पर्धेत दुसऱ्यांदा हे देश एकमेकांसमोर येणार आहेत. पहिल्यांदा जेव्हा या दोघांत लढत झाली तेव्हा मात्र पावसामुळे सामनाच रद्द झाला होता. यावेळी तरी पावसाचा फटका सामन्याला बसणार नाही, अशी आशा आहे.गावस्कर म्हणतात की, खेळाडूंना उत्तम मानसिक स्थितीत राहता आले पाहिजे हे खरे असले आणि त्यांना सर्वाधिक उत्तम सुविधाही मिळायला हव्यात हेही खरे असले तरी हंबनटोटा येथे पाऊसच नसल्यामुळे तिथे सामने का खेळविले जात नाही, हाही प्रश्न आहे.