शालेय अभ्यासक्रमात आतापर्यंत हेच शिकविण्यात आले आहे की, सूर्यमालेतील सगळे ग्रह हे सूर्याभोवती फिरत असतात. पृथ्वीदेखील सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. त्यातूनच दिवस रात्र होत असतात. पण आता पाकिस्तानमधल्या एका व्हीडिओने याच्या अगदी उलटे आणि विचित्र असे चित्र मांडले आहे. अवकाशाबाबत ज्या संकल्पना वैज्ञानिकांनी मान्य केलेल्या आहेत, त्याच्या अगदी विरुद्ध भूमिका एक पाकिस्तानी विद्यार्थी मांडत असल्याचे दिसते. कृष्णा नावाच्या व्यक्तीने X वर हा व्हीडिओ अपलोड केला आहे. २७ मिनिटांच्या या व्हीडिओतील दावे हास्यास्पद ठरले आहेतच पण त्यावर लोकांनी प्रतिक्रिया देत त्या दाव्यांची खिल्ली उडविली आहे.
भारताच्या यशस्वी चांद्रयान मोहिमेनंतर पाकिस्तानकडून येणाऱ्या प्रतिक्रियांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागे एका पाकिस्तानी वाहिनीवर भारताचे कसे कौतुक केले गेले याचाही व्हीडिओ व्हायरल झाला होता. पाकिस्तानमधील काही नागरीकही भारताने अवकाश संशोधनात केलेल्या या कामगिरीचे कौतुक करताना दिसले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्याच्या मुलाखत घेतल्यावर मात्र वेगळेच ज्ञान समोर आले.
हेही वाचा :
वॅगनरचे प्रमुख प्रीगोझिन यांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब
…आणि रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी, तिकीट तपासनीसांनी डोळ्यावर बांधल्या पट्ट्या
“‘मातोश्री’च्या निकटवर्तीयाकडून नितीन देसाईंना धमक्या”
शाळेत इस्लामिक अबाया पोषाख नको! फ्रान्समध्ये घालणार बंदी
यातील एक पाकिस्तानी मदरशातील विद्यार्थी म्हणतो की, सूर्य आणि चंद्र हे पृथ्वीभोवती फिरतात. त्यामुळेच दिवस आणि रात्र होते. हवामान बदलते. हा व्हीडिओ विविध सोशल मीडिया चॅनेलवर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हीडिओला ५ लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
अनेक विषयांवर मदरशात शिक्षण दिले जाते. कारण जगाच्या शर्यतीत आपण मागे राहू नये म्हणून सगळ्या प्रकारचे शिक्षण इथे दिले जाते. त्यानंतर व्हीडिओमध्ये प्रश्नकर्तीने विचारले की, पृथ्वी ही चपटी आहे की गोल. यावर तो विद्यार्थी म्हणाला की, ती फिरत नाही. त्यावर प्रश्नकर्ती म्हणाली की, मग पृथ्वीवर वातावरण कसे बदलते, दिवसरात्र कसे होतात, यावर तो विद्यार्थी म्हणाला की, पृथ्वी ही स्थिर आहे. चंद्र फिरतो, सूर्य रोज उगवतो आणि नंतर मावळतो. सूर्य उलट फिरत असतो पृथ्वीभोवती.
या विद्यार्थ्याचे हे ज्ञान पाहून अनेकांनी त्यावर खिल्ली उडविणाऱ्या टिपण्ण्या केल्या आहेत. रणबीर कपूरचा एक आश्चर्याने बघणारा फोटो टाकून त्यावर लिहिले आहे की, क्या बात कर रहा है भाई?
दुसऱ्याने लिहिले आहे की, मी ही माहिती आमच्या विज्ञानाच्या शिक्षकांना पाठवली तर ते आता फोनच उचलत नाहीत. त्यांना कदाचित धक्का तर बसेल ना?
एकाने गॅलेलिओचा फोटो टाकत गॅलेलिओ जागा झाला असे म्हटले आहे.