लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी रत्नागिरीतील नेवरे गावाला भेट दिली. नेवरे गावातील श्री देव आदित्यनाथ हे सुमित्रा महाजनांचे कुलस्वामी. नेवरे गावातील महाजनांचे कुलस्वामी श्री आदित्यनाथ यांचे त्यांनी आशीर्वाद घेतले. श्री आदित्यनाथ मंदिर देवस्थान कमिटीने सुमित्रा महाजन यांचे यथोचित स्वागत केले आहे.
याआधीही सुमित्रा ताईंनी नेवरे गावाला भेट दिल्या आहेत. सुमित्रा महाजन लोकसभेच्या अध्यक्ष असतानाही त्यांनी नेवरे गावात येऊन आपल्या कुलस्वामींचे दर्शन घेतले आहेत. अध्यक्ष असताना त्यांनी आपली सिक्युरीटी रत्नागिरीत थांबवली होती. मी माझ्या देवाच्या दर्शनासाठी एकटीच जाणार, असे सांगून त्यांनी खासगी वाहनाने त्या आदित्यनाथाच्या दर्शनाला एकट्याच आल्या होत्या.
सुमित्राताई लोकसभेच्या सोळाव्या अध्यक्ष, पद्भूषण, सलग आठ वेळा इंदूरच्या खासदार राहिलेल्या आहेत. चिपळूणच्या उषा आणि पुरुषोत्तम साठे यांच्या त्या सुकन्या. २९ जानेवारी १९६५ रोजी इंदूरच्या महाजन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. महाजन इंदौरचे. नेवरे गावचे ग्रामदैवत श्री देव आदित्यनाथ महाजन यांचे कुलस्वामी. कुलस्वामींच्या दर्शनासाठी त्या वारंवार येत असतात.
आदित्यनाथ हे सूर्यमंदिर आहे. भारतात सूर्यमंदिरे फारच थोडी आहेत. त्यात कोकणात राजापूरचे कशेळी गावातील कनकादित्य तर नेवऱ्यातील आदित्यनाथ ही मंदिरे आहेत. आदित्यनाथ हा नेवरे गावाचा ग्रामदैवत. पेंडेसे, दातार, महाजन, वर्तक कुंटे, सोमन यांचा हा कुलस्वामी.
हेही वाचा :
ब्रिटनस्थित गुंडाने केली नफेसिंग राठींची हत्या?
अयोध्या, श्रीनगरमध्ये होणार ‘महाराष्ट्र दर्शन’
अनंत अंबानीचा “वनतारा”, हत्तींपासून वाघापर्यंत मिळाले अत्याधुनिक घर!
विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे मोठे योगदान दर्शविणारा अर्थसंकल्प
श्री देव आदित्यनाथ व देवी भगवतीमाता देवस्थान कमिटीने हे देऊळ ग्रामस्थांच्या वतीने जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. या मंदिरालाही त्या मदत करणार आहेत, असे त्यांनी देवस्थान कमिटीला सांगितले आहे. सुमित्रा महाजन यांनी पेन्शनमधून मिळणाऱ्या पैशांमधून मंदिराला नक्कीच मदत करेन, असे आदित्यनाथ कमिटीचे मदन मोरे यांना म्हणाल्या आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, मंदिराचे बांधकाम सुंदर होत आहे. पुढील वर्षी रथसप्तमीला या मंदिराच्या होणाऱ्या जीर्णोद्धाराला त्यांनी येण्याचे मान्यही केलेले आहे.