५० आणि ६० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेता चंद्रशेखर यांचं वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील अंधेरी येथे राहत्या घरी त्यांनी ७:३० वाजता अखेरचा श्वास घेतला. मागील बऱ्याच काळापासून त्यांना आजारपणानं ग्रासलं होतं. ५० च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती. पुढे त्यांनी चरित्रात्मक भूमिकांनाही न्याय दिला.
चंद्रशेखर यांचा नातू, विशाल शेखर यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना ताप आल्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यानंतर त्यांना जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, त्यानंतर त्यांना घरीही आणण्यात आलं होतं. अखेरच्या दिवसांमध्ये आपण कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करावा अशीच आजोबांची इच्छा होती असं त्यांच्या नातवानं सांगितलं.
कलाविश्वात कारकिर्दीची सुरुवात ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून केली, अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्यानंतर त्यांना मध्यवर्ती भूमिकांमध्ये साकारण्याची संधी मिळाली. हैदराबादमध्ये जन्मलेल्या चंद्रशेखर यांनी १९५३ मध्ये व्ही. शांताराम यांच्या ‘सुरंग’ मध्ये पहिल्यांदाच मध्यवर्ती भूमिका साकारली होती. यानंतर ते ‘कवी’, ‘मस्ताना’, ‘बरादरी’, ‘काली टोपी लाल रुमाल’, ‘स्ट्रीट सिंगर’ या चित्रपटांतही भूमिका साकारल्या.
हे ही वाचा :
उल्हासनगर महापालिकेचे स्थायी समिती सभापतीपद भाजपाकडे
हमेल्सच्या स्वयंगोलच्या जीवावर फ्रान्स शिलेदार
कोल्हापूरात छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात आंदोलन सुरु
काँग्रेसमध्ये भाई जगताप विरुद्ध झिशान सिद्दिकी
६० आणि ७० च्या दशकात त्यांनी ‘कटी पतंग’, ‘हम तुम और वो’, ‘अजनबी’, ‘महबूबा’, ‘अलग-अलग’, ‘शक्ती’, ‘शराबी’, ‘डिस्को डांसर’, ‘नमक हलाल’, ‘द बर्निंग ट्रेन’ या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या. १९९८ मध्ये दूरदर्शनवर प्रदर्शित रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत चंद्रशेखर यांनी आर्य सुमंत हे पात्र साकारलं होतं. त्यांनी साकारलेल्या या भूमिकेला कमालीची लोकप्रियता मिळाली होती.