प्रा. सु. ग. शेवडे यांच्या धर्मपत्नी सुमंगला शेवडे कालवश

सुमंगला शेवडे यांच्या पार्थिवावर चेंबूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

प्रा. सु. ग. शेवडे यांच्या धर्मपत्नी सुमंगला शेवडे कालवश

भारताचार्य आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते तसेच प्रवचनकार प्रा. सु. ग. शेवडे यांच्या धर्मपत्नी तसेच ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या मातोश्री सुमंगला शेवडे यांचे दीर्घ आजाराने चेंबूर येथे निधन झाले. शनिवारी सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्युसमयी त्यांचे वय ८१ होते. त्यांच्या पश्चात दोन पुत्र, सुना, नातवंडे, पणती असा परिवार आहे. सुमंगला शेवडे यांच्या पार्थिवावर चेंबूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सु. ग. शेवडे हे शिक्षक म्हणून नोकरी करत होते. राजापूर, शहापूर, पडघा, वाडा याठिकाणी ते शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून नोकरी करत होते. नोकरी सांभाळत त्यांचे कीर्तन आणि प्रवचनही चालत असे. तत्त्वांशी कोणतीही तडजोड नसल्यामुळे १३ नोकऱ्या बदलल्या. मात्र अशाही परिस्थितीत सुमंगला यांनी संसाराचा गाडा अत्यंत संयमाने, नेटाने हाकला.

हे ही वाचा:

आफ्रिकेचे चित्ते स्थिरावल्यावर आता भारतात होतेय कोलंबियातील पाणघोड्यांचे आगमन

संजय राऊतांना धमकीदेवेंद्र फडणवीसांचा धमाका…

अमृता फडणवीस खंडणी प्रकरणी ‘बुकी’ अनिल जयसिंघानीचा जामीन नाकारला

सदाबहार, रुबाबदार क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे निधन

चेंबूरमध्ये कुणाचे व्याख्यान असले की त्या व्याख्यानासाठी मुलांना आवर्जून पाठवत. तेथे गेला नाहीत तर जेवायला मिळणार नाही, असा दटावणीचा स्वर असे. त्यामुळे लहानपणापासूनच विविध क्षेत्रातील वक्त्यांकडून चांगले ऐकायला मिळाले, अशी त्यांचे सुपुत्र सच्चिदानंद शेवडे यांची भावना होती. २०१६ला सच्चिदानंद शेवडे यांच्या ‘सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स’ या पुस्तकाचे ठाणे येथे प्रकाशन सुमंगला यांच्या हस्ते करण्यात आले होते.

Exit mobile version