आसाम-त्रिपुरामध्ये ८ बांगलादेशी घुसखोरांना अटक, दलालही ताब्यात!

चार जणांना माघारी पाठवले

आसाम-त्रिपुरामध्ये ८ बांगलादेशी घुसखोरांना अटक, दलालही ताब्यात!

आसाम आणि त्रिपुरामधील सुरक्षा यंत्रणांनी ८ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. दोन्ही राज्यातून ४-४ असे आठ घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. यासह त्रिपुरामध्ये घुसखोरांसोबत एक दलालही पकडला गेला आहे. या प्रकरणी सुरक्षा दलाची पुढील कारवाई सुरु आहे.

त्रिपुरा रेल्वे स्थानकावर पकडण्यात आलेले घुसखोर देशाच्या इतर भागात जाण्याच्या तयारीत होते. तत्पूर्वी सुरक्षा दलाने कारवाई करत त्यांच्या मुसक्या आवळल्या. तर आसाममध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ चार घुसखोरांना पकडण्यात आले. मुहम्मद सुलेमान, मुहम्मद यासीन, फातिमा खातून आणि सुरा खातून अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यासोबत दोन मुलेही होती. या सर्वांना अटक केल्यानंतर आसाम पोलिसांनी त्यांना बांगलादेशला परत पाठवले.

त्याचवेळी, त्रिपुरात पकडलेले घुसखोर खोवाई जिल्ह्यात खोलवर पोहोचले होते आणि तेलियामुडा रेल्वे स्थानकावरून इतरत्र जाण्याच्या बेतात होते. याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळताच ते पकडले गेले. आता त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

पूर्व लडाखमधील एलएसीजवळ चीनकडून सराव

दलित मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी २३ जणांना अटक

विदेशी भाविकांना महाकुंभ मेळाव्याची भुरळ; खऱ्या भारताचे दर्शन घडत असल्याच्या भावना

आप आमदार मोहिंदर गोयल यांची आज पोलीस चौकशी

 

Exit mobile version