छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षादलांनी शनिवारी मोठी कारवाई करत १६ नक्षलवाद्यांना ठार केले. या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याला ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद समाप्त करण्याच्या सरकारच्या संकल्पाचा एक भाग असल्याचे म्हटले आहे. अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करत लिहिले, नक्षलवादावर आणखी एक प्रहार.
आमच्या सुरक्षा दलांनी सुकमा येथे एका मोठ्या मोहिमेत १६ नक्षलवाद्यांना ठार केले आणि मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रसाठा जप्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ३१ मार्च २०२६ पूर्वी नक्षलवाद संपवण्याचा संकल्प केला आहे. हत्यारे उचलणाऱ्यांना माझी विनंती आहे की, हिंसेने नव्हे तर केवळ शांती आणि विकासानेच परिवर्तन शक्य आहे.
हेही वाचा..
राहुल गांधी कधीच कुटुंबाच्या घरट्याबाहेर पडू शकणार नाहीत
कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या, खार पोलिसांकडे आणखी तीन गुन्हे दाखल
काश्मीरमधील बडगाममध्ये पॅलेस्टाईन समर्थक रॅलीचे आयोजक, सहभागींवर गुन्हा दाखल
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी विकसित राष्ट्राची कल्पना मांडली
केरलापाल परिसरात सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेत आतापर्यंत १६ नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. २८ मार्चपासून सुरू असलेल्या या ऑपरेशनमध्ये जिल्हा राखीव रक्षक आणि केंद्रीय राखीव पोलीस दलच्या संयुक्त पथकाने नक्षलवाद्यांविरोधात कारवाई केली. २९ मार्च रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. २५ मार्च रोजी सुरक्षा दलांनी इनामी नक्षली सुधीर ऊर्फ सुधाकर याच्यासह ३ नक्षलवाद्यांना ठार केले होते.