बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणात अटक करण्यात आलेला पंधरावा आरोपी सुजित सुशील सिंग उर्फ बब्बू (३२)या आरोपीच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी सुजित सिंग आणि पाहिजे आरोपी अनमोल बिष्णोई यांच्या सांगण्यावरून नितीन सप्रे आणि राम कनोजिया यांनी बाबा सिद्दीकीच्या घराची आणि झिशान सिद्दीकीच्या कार्यालयाची रेकी होती. सुजित याला पंजाब मधील लुधियाना येथून ताब्यात घेऊन शुक्रवारी रात्री मुंबईत आणण्यात आले, दरम्यान त्याला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता सुजितला न्यायालयाने ४ नोव्हेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
वांद्रे पूर्व येथे बाबा सिद्दीकी यांच्यावर १२ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने १५ जणांना अटक केली आहे. या गुन्ह्याच्या कटातील सूत्रधार शुभम लोणकर, झिशान अख्तर आणि शिवकुमार गौतम हे अद्याप फरार असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. या गुन्ह्यात लॉरेन्स बिष्णोईचा चुलत भाऊ कॅनडास्थित अनमोल बिष्णोई याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे, याबाबत मात्र पोलिसांनी अधिकृतरित्या काहीही सांगण्यास नकार दिला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक करण्यात आलेला पंधरावा आरोपी सुजीत सिंग उर्फ बब्बू हा कथितपणे विविध सोशल मीडिया ॲप्सवरील अनेक खात्यांद्वारे संवाद साधत होता अशी माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा :
दिवाळीसाठी गावी निघालेल्या प्रवाशांची वांद्रे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी!
कराचीमधून अपहरण झालेले आठ बलुच विद्यार्थी घरी परतले!
काँग्रेस महाविकास आघाडीत राहील असे वाटत नाही!
संजू बनलेल्या सलीमने हिंदू प्रेमिकेची हत्या करत सहा फूट जमिनीत गाडले!
या ॲप्सवर अनेक खाती बनवली गेली होती आणि ते एकमेकांच्या संपर्कात होते,” एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. पंजाब पोलिसांच्या माहिती नुसार सुजीत सिंग हा बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी तो मुंबई पोलिसांना हवा होता. लुधियाना येथे संयुक्त कारवाईत त्याला अटक करण्यात आली. पंजाब पोलिसांच्या महासंचालककाच्या ‘एक्स'(ट्विटर) खात्यात नमूद केले आहे की सिंग यांना नितीन सप्रे याने तीन दिवस अगोदर हत्येची माहिती दिली होती. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात सिंग सामील होता, असे मुंबई गुन्हे शाखेने म्हटले आहे. तो पूर्वी घाटकोपरच्या छेडा नगर भागात राहत होता आणि पंजाबच्या लुधियानामधून त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मागणी करताना, मुंबई पोलिसांनी एस्प्लानेड न्यायालयाला सांगितले की त्यांनी पाच पिस्तुल जप्त केल्या आहेत आणि टोळीला आणखी काही शस्त्रे पुरवली गेली असावीत असा संशय आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग यांना बाबा सिद्दीकीच्या हत्येचा कट रचल्याची माहिती होती आणि तो अनमोल बिश्नोईच्या संपर्कात होता. तो इतर आरोपींना पैसे पुरवत असे आणि शस्त्र पुरवठ्यात त्याचा सहभाग होता. गुन्हा घडण्याच्या एक महिन्यापूर्वी सिंग मुंबईतून पळून गेला होता आणि त्याला लुधियाना येथे अटक करण्यात आली होतीसिंग उर्फ बब्बू हा पाहिजे आरोपी झिशान अख्तर याच्या गावचा असून तो झिशान च्या संपर्कात होता. तसेच गुन्हा घडण्याच्या चार ते पाच महिन्यांपूर्वी तो सप्रे आणि अन्य कथित साथीदारांच्या संपर्कात आला अशी माहिती समोर आली आहे. सिंग याच्यावर अद्याप कुठेही गुन्हा दाखल नाही, मात्र, पोलीस याची पडताळणी करत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.