मंत्रालयात जेष्ठ नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न !

अग्निशमन दलाच्या पथकाने केलं रेस्क्यू

मंत्रालयात जेष्ठ नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न !

मंत्रालयामध्ये एका जेष्ठ नागरिकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरील खिडकीच्या बाहेर येऊन या जेष्ठ नागरिकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने आत्महत्या करण्याऱ्या जेष्ठ नागरिकाला सुखरून खाली उतरवले आहे.

अरविंद सावंत असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जेष्ठ नागरिकाचे नाव असून ती व्यक्ती सातारा जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. आपले कामं होत नसल्याने या व्यक्तीने आत्म्हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्या व्यक्तीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तास भर हा थरारक नाट्यमय प्रकार घडत होता. अग्निशमन दल देखील घटनास्थळी दाखल होऊन नागरिकाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर पोलीस आणि अग्निशमन दलाने आत्महत्या करणाऱ्या जेष्ठ नागरिकांची समजूत काढली आणि अग्निशमन द्लाच्या पथकाने त्यांना क्रेनच्या सहाय्याने सुखरून खाली उतरवण्यात आले.

हे ही वाचा:

म्हणे “धर्मनिरपेक्षतेसाठीच अल्पसंख्यांकांना राजकीय आरक्षण !”

वसंत मोरेंची आता नवी पसंत..उबाठा गटात प्रवेश !

दाम्पत्याच्या आत्महत्येचे अखिलेश यादव यांनी केले राजकारण

वरळी हिट अँड रन प्रकरण, जुहूतील ग्लोबल तपस बार सील!

दरम्यान, याआधीदेखील अनेकदा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न झाला आहे. या घटनांची दखल घेऊन प्रशासनाने मंत्रालयाच्या आतील बाजूस सुरक्षा जाळी बसविली आहे. तसेच अशाप्रकारे टोकाचा निर्णय कुणीही घेऊ नये, असं आवाहन देखील वारंवार केलं जात आहे.

Exit mobile version