शिवकालीन दांडपट्ट्याला ‘राज्यशस्त्र’ म्हणून मिळणार दर्जा!

शिवराज्याभिषेक दिनी करणार घोषणा, सुधीर मुनगंटीवर यांची माहिती

शिवकालीन दांडपट्ट्याला ‘राज्यशस्त्र’ म्हणून मिळणार दर्जा!

शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शिवजयंतीच्याच दिवशी उद्या (१९ फेब्रवारीला) दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

उद्या १९ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार आहे.दरवर्षीप्रमाणे किल्ले शिवनेरीवर शासकीय कार्यक्रम होणार आहेत .तसेच राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रात्री आठ वाजता आग्र्यात लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवर उपस्थित असणार आहेत.

शिवजयंतीच्या निमित्ताने दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवर दिली.आग्र्याच्या लाल किल्ल्यात पार पडणाऱ्या सोहळ्यात दांडपट्टा शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित करणार असल्याची मंत्री मुनगंटीवर यांनी सांगितले.शिवप्रेमींसाठी ही मोठी बातमी आहे.

हे ही वाचा:

बारामतीत रंगणार पैठणीचा खेळ

देशभरातील न्यायालयांत ४.४७ कोटी खटले प्रलंबित

अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या दर्शनाची नवी व्यवस्था

भारताची ‘यशस्वी’ घौडदौड; तिसऱ्या दिवसाअंती ३२२ धावांची आघाडी

सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवर म्हणाले की, राज्यशस्त्र म्हणून ‘दांडपट्टा’ हा घोषित करणार आहोत.जगातील सर्व देशांचा अभ्यास केल्यानंतर साधारणतः युद्धशास्त्रामध्ये ‘दांडपट्टाचा’ सर्वात जास्त उपयोग हा मराठा लष्करांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आहे.माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते या दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून घोषित करणार आहोत, असे मंत्री मुनगंटीवर म्हणाले.

आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा औरंगजेबाने भरदरबारात अपमान केला. त्याच दरबारात येत्या सोमवारी ‘जय शिवाजी-जय भवानी’च्या घोषणांचा जयघोष होईल आणि शिवजयंतीच्या निमित्ताने ऐतिहासिक दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात येईल. दांडपट्ट्याला राज्यशस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.दरम्यान, यापुढे राज्यशस्त्र म्हणून दांडपट्ट्याची नवी ओळख निर्माण होणार आहे.

Exit mobile version