शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे टिकलीसंदर्भातील वादामुळे चर्चेत आले आहेत. मात्र, लेखिका आणि इन्फोसिसच्या प्रमुख सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे यांच्या भेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भेटीदरम्यान, सुधा मूर्ती यांनी संभाजी भिडेंचे आशीर्वाद घेतले. विशेष म्हणजे यावेळी सुधा मूर्ती मराठी पेहरावमध्ये होत्या. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामुळे आता सोशल मीडियावर याची चर्चा सुरू झाली आहे.
सुधा मूर्ती यांनी काल कुरुंदवाड इथल्या आपल्या जुन्या घरी भेट दिली. तिथे एका कार्यक्रमामध्ये त्यांना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे भेटले. त्यावेळी या दोघांमध्ये चार ते पाच मिनिटं चर्चाही झाली. त्यानंतर सुधा मूर्ती संभाजी भिडे यांच्या पाया पडल्या. यावेळी सुधा मूर्ती मराठमोळ्या पेहरावात दिसल्या. त्यांनी साडी, नथ, तसेच केसांत गजराही माळला होता. त्यामुळे आता सोशल मीडियावर याची चर्चा सुरू आहे.
जेव्हा सुधा मुर्ती या संभाजी भिडे गुरुजींच्या चरणी नतमस्तक होवून आशीर्वाद घेतात! pic.twitter.com/tm3pr93NWu
— पवन/Pawan 🇮🇳 (@ThePawanUpdates) November 7, 2022
हे ही वाचा:
रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांवर गुन्हा दाखल
भारत जोडोसाठी KGF-2 जोडो पडले महागातं
सत्तारांचे समर्थन नाही, पण महाराष्ट्रात सिलेक्टिव्हपणा केला जातो
नीलमताई गॅरेण्टी उद्धव ठाकरे यांची तरी आहे का?
दरम्यान, संभाजी भिडे हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या टिकली संदर्भातील वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन, असे संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराला म्हटलं होतं. त्यावरून संभाजी भिडे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यानंतर त्यांना महिला आयोगाने कारवाईची नोटीस पाठवली आहे. हा वाद अजूनही सुरूचं आहे. मात्र, सध्या सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे यांची भेट हा चर्चेचा विषय बनला आहे.