26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषभारतीय वायूसेनेचे 'भीष्म पोर्टेबल हॉस्पिटल' अवतरले!

भारतीय वायूसेनेचे ‘भीष्म पोर्टेबल हॉस्पिटल’ अवतरले!

अपात्कालीन काळात होणार मोठी मदत

Google News Follow

Related

अपघात क्षेत्र असो वा युद्धाचे मैदान भारतीय हवाई दलाच्या कामगिरीने आपल्या नावाचा आणि ओळखीचा डंका वाजवला आहे.याच मालिकेत भारतीय वायू सेनेने आणखी एक इतिहास रचला आहे.भारत सरकारच्या अधिरित्याखाली संरक्षण मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने तयार केलेल्या ‘भीष्म पोर्टेबल हॉस्पिटल’ची हवाई दलाकडून घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली आहे.भारतीय वायुसेनेने आग्रा येथे हे ‘भीष्म पोर्टेबल हॉस्पिटल’ सुमारे १५०० फूट उंचीवरून जमिनीवर उतरवले आणि ते यशस्वी ठरले.

‘भीष्म पोर्टेबल हॉस्पिटलचा मुख्य उद्देश म्हणजे अपघातग्रस्त, युद्धक्षेत्राच्या ठिकाणी लवकरात लवकर जखमींना उपचार मिळावा हा आहे.या हॉस्पिटलची उभारणी करण्यासाठी केवळ १२ मिनिटांचा कालावधी लागणार आहे.दोन पॅराशूटच्या मार्फत हे पोर्टेबल हॉस्पिटल सुमारे १५०० फूट उंचीवरून जमिनीवर उतरवण्यात आले आणि ते यशस्वी ठरले.कोणत्याही अपघात ग्रस्त ठिकाणी हे ‘भीष्म पोर्टेबल हॉस्पिटल’ उतरू शकते आणि त्वरित जखमींना उपचार मिळू शकतो.या पोर्टेबल हॉस्पिटलची एका टेन्ट स्वरूपात उभारणी होते आणि यामध्ये एकूण २०० लोकांचा उपचार होईल एवढी औषध सामग्री असते.

हे ही वाचा:

लालूप्रसाद, अब्दुल्ला मोदींच्या पत्नी-मुलांवरून टीका करण्यापर्यंत घसरले!

बरेलीची फरजाना बनली पल्लवी; मुरादाबादची नर्गिस बनली मानसी!

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीचा फुटबॉलला अलविदा!

चाललंय काय? भारत चंद्रावर पोहोचला, कराचीतली मुले मात्र गटारात!

क्युब्समध्ये (खोखे ) ही सर्व औषधे ठेवलेली असतात आणि ते पॅराशूट मधून खाली उतरवले जाते.हे खोखे मोठे आणि हलके असतात.पॅराशूटमधून औषधांचे बॉक्स खाली उतरल्यानंतर लगेच याचे टेन्टमध्ये रूपांतर केले जाते.अगदी कमी कालावधीमध्ये ‘भीष्म पोर्टेबल हॉस्पिटल’ तयार होते.विशेष म्हणजे हे पूर्णपणे वॉटरप्रूफ असल्याने पाण्यात, जंगलात आणि डोंगर ठिकाणी या हॉस्पिटलची उभारणी केली जाऊ शकते,

या यशस्वी चाचणीचा एक व्हिडिओ केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरवर शेअर केला आणि लिहिले की, ‘भारतीय वायुसेनेने आग्रा येथे स्वदेशी मोबाईल हॉस्पिटल ‘भीष्म क्यूब’ची यशस्वी चाचणी केली. कोठेही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि सर्वसमावेशक वैद्यकीय सहाय्य प्रदान करण्यात हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी लिहिले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा