आत्मनिर्भर नौदलाची ताकद वाढली; ब्राह्मोसची यशस्वी झेप

युद्धनौका ‘आयएनएस मुरगाव’वरून या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण

आत्मनिर्भर नौदलाची ताकद वाढली; ब्राह्मोसची यशस्वी झेप

भारतीय नौदलाची क्षमता वाढली असून नौदलाकडून रविवार, १४ मे रोजी ब्रहमोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. भारतीय नौदलाची महत्त्वाची आणि अग्रगण्य स्वयंचलित क्षेपणास्त्र प्रक्षेपण करणारी युद्धनौका ‘आयएनएस मुरगाव’वरून या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. यामुळे भारताच्या नौदलाची ताकद आणखी वाढली आहे.

युद्धनौका आणि ब्रह्मोस हे शक्तिशाली क्षेपणास्त्र दोन्ही स्वदेशी निर्मिती आणि आत्मनिर्भरतेचे प्रतिके असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. या यशस्वी चाचणीमुळे भारतीय नौदलाच्या सागरातील मारक क्षमतेची शक्ती वाढली आहे. या नव्या युद्धनौकेवरून केलेली ब्राह्मोसची पहिलीच चाचणी यशस्वी झाली. अचूक लक्ष्यवेध घेण्यात हे क्षेपणास्त्र यशस्वी ठरले. ही चाचणी कुठे घेतली हे अद्याप सांगण्यात आलेले नाही.

आत्मनिर्भर भारत संकल्पना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना भारताला विकासाच्या वाटेवर वेगाने पुढे घेऊन जात आहे. तसेच देशाला जागतिक मंचावर एक वेगळी ओळख मिळत असून शक्तिशाली अर्थव्यवस्था म्हणून भारत आज समोर येत आहे. प्रत्येक क्षेत्रात भारताने आत्मनिर्भर बनावं यासाठी नरेंद्र मोदी आग्रही आहेत. संरक्षण क्षेत्रात देशाने आत्मनिर्भर बनून प्रगती करावी यासाठी ते विशेष प्रयत्नशील आहेत.

ब्रह्मोस आणि आत्मनिर्भर भारत

भारत आणि रशियाच्या संयुक्त प्रकल्प असलेल्या ‘ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड’तर्फे या क्षेपणास्त्राची निर्मिती केली जाते. ही क्षेपणास्त्रे पाणबुडी, युद्धनौका, विमाने किंवा जमिनीवरूनही प्रक्षेपित करता येतात. ब्राह्मोस ध्वनीच्या वेगापेक्षा जवळपास तिप्पट वेगाने उडते.

हेही वाचा :

कर्नाटकमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत; भाजपाची हार, जनता दलानेही गमावला विश्वास

द केरळ स्टोरी’ यांसारख्या चित्रपटांवर बंदी घालण्याची प्रथा जुनीच !

नवऱ्याने वऱ्हाडींसाठी चिकनचा धरला आग्रह आणि लग्न मोडले, वधूने मग धडा शिकवला!

गोल्डन बूट पुरस्कार विजेत्या अंध फुटबॉलपटूला बलात्कारप्रकरणी तुरुंगवास

ब्राह्मोस हे रशियाच्या P-800 ओशीयन क्रुझ मिसाईल तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे क्षेपणास्त्र भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांकडे सोपवण्यात आले आहे.

भारत ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची निर्यातही करत आहे. गेल्या वर्षी जानेवारीत भारताने क्षेपणास्त्राच्या तीन बॅटरी पुरवण्यासाठी फिलीपिन्ससोबत ३७ कोटी पाच लाखांचा करार केला होता.

Exit mobile version