30 C
Mumbai
Saturday, October 5, 2024
घरविशेषभारताची ताकद वाढणार, ‘अग्नी प्राइम’ ची यशस्वी चाचणी!

भारताची ताकद वाढणार, ‘अग्नी प्राइम’ ची यशस्वी चाचणी!

डीआरडीओकडून ‘अग्नि प्राइम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Google News Follow

Related

भारताने संरक्षण क्षेत्रात नवी झेप घेत एका क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) नवीन पिढिच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ‘अग्नी प्राइम’ ची यशस्वी चाचणी घेतली आहे. ओदिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली असून चाचणी दरम्यान, सर्व उद्दिष्टे यशस्वीरित्या साध्य करण्यात आली आहेत.

ओडिशाच्या किनार्‍यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ‘अग्नि प्राइम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने निवेदनात दिली आहे. प्रणालीची अचूकता आणि विश्वासार्हता तपासण्यासाठी अग्नि प्राइम क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी विकासात्मक चाचण्यांनंतर वापरकर्त्यांनी प्री-इंडक्शन नाईट लाँच केलं.

डीआरडीओने बुधवार, ७ जून रोजी रात्री ७.४० वाजता अब्दुल कलाम बेटावरील लॉन्चिंग कॉम्प्लेक्स चार वरून ‘अग्नि प्राइम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. संपूर्ण प्रक्षेपणाची माहिती आणि आकडेवारी नोंदवण्यासाठी टर्मिनल पॉईंटवर दोन डाउन- रेंज जहाजांसह वेगवेगळ्या ठिकाणी रडार, टेलीमेट्री आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीम यांसारखी उपकरणे- प्रणाली तैनात करण्यात आली होती.

डीआरडीओ आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडचे वरिष्ठ अधिकारी या यशस्वी उड्डाण-चाचणी प्रसंगी उपस्थित होते. आता या प्रणालीचा सशस्त्र दलांमध्ये समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि सशस्त्र दलांचे या यशाबद्दल तसेच नव्या पिढिच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि प्राइमच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.

हे ही वाचा:

अखेर प्रतीक्षा संपली; देवभूमीत मान्सूनचे आगमन!

…म्हणून ममता बॅनर्जी यांनी मोदींना पाठवले लक्ष्मणभोग आंबे!

आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा, रेपो रेट जैसे थे स्थितीत

‘स्टीव्ह स्मिथ आमच्या पिढीतील सर्वोत्तम कसोटी फलंदाज’

अग्नि प्राइम क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये

  • ११ हजार किलो वजनाच्या या क्षेपणास्त्रात २ हजार किलोमीटर अंतरापर्यंतच्या कोणत्याही लक्ष्याला लक्ष्य करण्याची क्षमता
  • ३४.५ फूट लांबीच्या क्षेपणास्त्रावर एक किंवा अनेक स्वतंत्रपणे टार्गेटेबल रीएंट्री व्हेईकल (MIRV) वॉरहेड्स बसवणे शक्य
  • क्षेपणास्त्राद्वारे अनेक लक्ष्यांवर हल्ला करण्याची क्षमता
  • क्षेपणास्त्र उच्च- तीव्रतेची स्फोटक आणि आण्विक शस्त्र वाहून नेण्यास सक्षम
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा