तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला मोठं यश मिळालं असून गुरुवार, १९ मे रोजी आयआयटी मद्रासमध्ये 5G सेवेचे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पहिला 5G व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल केला. या 5G कॉलचा टेस्टिंग व्हिडीओ अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच हे संपूर्ण नेटवर्क भारतात डिझाईन आणि विकसित करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
5G टेस्ट बेड एकूण आठ संस्थांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. आयआयटी मद्रासच्या नेतृत्वाखाली ते विकसित करण्यात आले आहे. IIT दिल्ली, IIT हैदराबाद, IIT बॉम्बे, IIT कानपूर, IISc बंगलोर, सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (SAMEER) आणि सेंटर ऑफ एक्सलन्स इन वायरलेस टेक्नॉलॉजी (CEWiT) यांचा या प्रोजेक्टमध्ये समावेश आहे.
5G व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल यशस्वी झाल्यावर अश्विनी वैष्णव यांच्यासह संपूर्ण टीमने जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. भारताने विकसित केलेलं, भारतात बनलेलं आणि जगासाठी असलेलं हे तंत्रज्ञान असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. आत्मनिर्भर 5G असही ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
Aatmanirbhar 5G 🇮🇳
Successfully tested 5G call at IIT Madras. Entire end to end network is designed and developed in India. pic.twitter.com/FGdzkD4LN0
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) May 19, 2022
हे ही वाचा:
आमच्याकडे तिसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्याचेही संख्याबळ आहे
काँग्रेसचे जोखड सोडल्यावर जाखड भाजपावासी
‘काँग्रेस हा सर्वात मोठा जातीयवाद पक्ष’
पंजाब पोलिसांनी केला हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश, दोघांना अटक
5G सेवा सुरू झाल्यानंतर या तंत्रज्ञानामुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. याशिवाय जागतिक स्तरावरही भारताला याचा मोठा लाभ मिळणार आहे. देशातील पहिला 5G कॉल ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये सुरु करण्याचा प्रयत्न असेल. यासाठी जून ते जुलै दरम्यान स्पेक्ट्रम लिलाव प्रक्रिया घेण्यात येणार आहे.