INS अरिहंतवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारताने शुक्रवार, १४ ऑक्टोबर रोजी आण्विक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (Nuclear Capable Ballistic Missile) यशस्वी चाचणी केली आहे.

INS अरिहंतवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारताने शुक्रवार, १४ ऑक्टोबर रोजी आण्विक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (Nuclear Capable Ballistic Missile) यशस्वी चाचणी केली आहे. आयएनएस अरिहंतने (INS Arihant) काल पाणबुडीतून प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले.

भारताने आण्विक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली असून हे भारतासाठी एक महत्त्वाचं आणि मोठं पाऊल आहे. संरक्षण मंत्रालयाने यासंबंधी माहिती दिली आहे. भारताने आण्विक पाणबुडी INS अरिहंतवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. अनेक देशांकडून बॅलेस्टिक आणि आण्विक क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी योग्य तयारी असणे आवश्यक आहे. त्यामुळे भारताचं हे पाऊल फार महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

या क्षेपणास्त्राची पूर्वनिर्धारित श्रेणीपर्यंत चाचणी घेण्यात आली आणि त्याने अतिशय अचूकपणे बंगालच्या उपसागरातील लक्ष्याचा वेध घेतला.

हे ही वाचा:

धक्कादायक!! पाकिस्तानमध्ये रुग्णालयात आढळले ५०० मृतदेह

हॅरी पॉटरमधील ‘हॅग्रिड’ काळाच्या पडद्याआड

राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदेंच्या पाठीशी

न्यायालयाच्या आदेशानंतर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर

विशेष म्हणजे INS अरिहंतवरून चाचणी करण्यात आलेल्या क्षेपणास्त्राची पहिल्यांदाच संरक्षण मंत्रालयाने अधिकृत माहिती दिली आहे. INS अरिहंत २००९ पासून नौदलाच्या सेवेत आहे, मात्र तिच्या इतक्या वर्षांच्या कार्यकाळात कोणत्याही चाचणीची माहिती देण्यात आली नव्हती. INS अरिहंतबाबत नौदलाने नेहमीच गोपनीयता बाळगली आहे.

Exit mobile version