तेजस विमानातून ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार

तेजस विमानातून ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारतीय हवाई दलाची ताकद वाढली असून गोवा किनारपट्टीवर हवेतून हवेत मारा करणाऱ्या भारतीय बनावटीच्या ‘अस्त्र’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. बुधवार, २३ ऑगस्ट रोजी हवाई दलाचे लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट असलेल्या तेजस विमानातून तब्बल २० हजार फूट उंचीवर ही चाचणी घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गोवा किनारपट्टीवर तेजस विमानातून २० हजार फूट उंचीवरून ‘अस्त्र’ क्षेपणास्त्र हवेतून-हवेत लक्ष्यावर मारण्यात आले. एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए), डीआरडीओ आणि इतर विभागांशी समन्वय साधून एचएएलने हे यश मिळविले आहे. या यशस्वी चाचणीमुळे ‘मेक इन इंडिया’ या मोहिमेला चालना मिळाली आहे.

हे ही वाचा:

चांद्रयान- ३ मोहिमेचा प्रवास मोठ्या पडद्यावर दिसणार

जादवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्याच्या मृत्यूमागे रॅगिंग हेच कारण

विजयाच्या चंद्रपथावर चालण्याचा हा क्षण!

चांद्रयानात इस्रोकडून एआय तंत्रज्ञानाचा वापर

‘अस्त्र’ क्षेपणास्त्र काय आहे?

बियॉन्ड व्हिज्युअल रेंज हा हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा प्रकार असून ही क्षेपणास्त्रे साधारणपणे नजरेच्या टप्प्याच्या पलीकडील म्हणजे २० नॉटिकल मैल पलीकडील लक्ष्य भेदण्यात सक्षम असतात. या प्रकारातील क्षेपणास्त्रांमध्ये असलेल्या ड्युअल पल्स रॉकेट मोटरच्या साहाय्याने त्यांना एवढ्या दूरवरील अंतरावरील लक्ष्य भेदण्यासाठी सक्षम केले जाते. या क्षेपणास्त्रांमध्ये अतिशय दूर अंतरावरील लक्ष्य विमानातून निश्चित करण्याच्या यंत्रणाही कार्यान्वित आहे. तसेच त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या लक्ष्याने आपले स्थान बदलले तरीही ही क्षेपणास्त्रे बदललेल्या स्थानावरील लक्ष्याचा वेध घेण्यात सक्षम आहेत.

Exit mobile version