ऑपरेशन रियुनाईटमुळे ४०० मुलांची सुटका

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मुंबई पोलिसांनी ‘ऑपरेशन रीयुनायट’ मोहीम सुरू केली होती.

ऑपरेशन रियुनाईटमुळे ४०० मुलांची सुटका

मुंबई पोलिसांनी अपहरण, बेपत्ता किंवा हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत यशस्वीरीत्या पोहचवण्यासाठी ‘‘ऑपरेशन रीयुनाईट’ राबवले. या मोहिमेअंतर्गत मुंबई पोलिसांना १८ वर्षंखालील ४०० हुन अधिक मुलांची सुटका करण्यात यश आले आहे. तसेच गेल्या काही दिवसांत अपहरणाच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी दोन महिन्यांच्या आणि एका वर्षाच्या लहान मुलांचीही सुटका केली.

मुंबई पोलिसांनी ‘ऑपरेशन रीयुनाईट’ ही मोहीम १५ ऑगस्ट ते ३० सेप्टेंबररपर्यंत म्हणजे ४५ दिवस राबवली होती. यामध्ये १८ वर्षांखालील ४८७ मुलांची सुटका मुंबई पोलिसांनी केली आहे. २३० मुले आणि २५७ मुलींचा यामध्ये समावेश होता. सुटका करण्यात आलेल्या मुलांपैकी ६८ मुले आणि १३५ मुलींच्या बेपत्ता झाल्याच्या पोलिसांकडे नोंदी होत्या. दुसरीकडे १५४ मुले आणि १२२ मुलींबाबत पोलिसांकडे कोणतीही माहिती नव्हती. या मुलांनाही त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले. ‘ऑपरेशन रीयुनाईट’अंतर्गत केवळ अपहरण किंवा बेपत्ता झालेल्या बालकांनाच नव्हे, तर हरवलेल्या मुलांच्या तक्रारी नोंदवण्यात आलेल्या नाहीत किंवा आढळल्या नाहीत, अशा मुलांचीही सुटका करण्यात आली आहे.

३० ऑक्टोबरला मुंबईतून अपहरण झालेल्या एका वर्षाच्या मुलीची सुटका करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोन महिलांना अटक केली. या मुलीचे सांताक्रूझ येथून अपहरण करण्यात आले होते. तसेच गेल्या आठवड्यात दोन महिन्यांच्या मुलीची अँटॉप हिल परिसरातून सुटका केली.

हे ही वाचा:

भारताने कुवेतला कुवत दाखवत जिंकले सुवर्ण

ठाकरेंना सोडवेना अनैसर्गिक नात्याचा मोह…

वेंगसरकर अकादमीची पकड; हर्ष आघावचा बळींचा षटकार, रोहन नाबाद ८३

मालवणीतल्या बांगलादेशी व रोहिंग्यांवर लक्ष ठेवा!

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मुंबई पोलिसांनी ‘ऑपरेशन रीयुनायट’ मोहीम सुरू केली होती. दीड महिना चाललेल्या या मोहिमेदरम्यान पोलिसांनी संशयास्पद स्थितीत आढळणारी मुले, रेल्वे स्थानक, बसस्थानक किंवा कचरा वेचण्याऱ्या मुलांबाबत माहिती देण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले होते.

Exit mobile version