भारताचे ‘चांद्रयान- ३’ यान शुक्रवार, १४ जुलै रोजी दुपारी २.३५ मिनिटांनी यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. चांद्रयान-३ ने शुक्रवारी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी यशस्वी उड्डाण केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे अंतराळयान प्रक्षेपित करण्यात आलं आहे.
देशाच्या तिसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार करून ‘चांद्रयान-३’ चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले. यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांसह तमाम भारतीयांनी विजयी जल्लोष केला. भारत माता की जय च्या घोषणाही देण्यात आल्या होत्या. भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. भारताची चांद्रयान- ३ ही मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. या मोहिमेसाठी भारताने तब्बल ६१५ कोटी रुपये खर्च केले आहेत. चांद्रयान- ३ हे २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे.
हे ही वाचा:
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस
लखनऊच्या या ‘रॉकेट वूमन’कडे चांद्रयान ३ ची जबाबदारी
बंद दाराआड झालेल्या गोष्टी ठाकरेंच्या आग्रहाखातर रश्मी वहिनींना सांगाव्या लागल्या
मोदी यांचा ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ पुरस्काराने सन्मान
हे यान ३.८४ लाख किलोमीटरचा प्रवास करून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. याआधीचा चांद्रयान-२ द्वारे चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यानंतर इस्रो पुन्हा चार वर्षानंतर चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर तेथील माहिती गोळा करुन चंद्राची रहस्यं उलगडण्यास मदत होईल.