आयएनएस विक्रांतवर यशस्वीरित्या उतरवले हेलिकॉप्टर

आयएनएस विक्रांतवर यशस्वीरित्या उतरवले हेलिकॉप्टर

संपूर्ण भारतीय बनावटीच्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू नौकेच्या चाचणी दरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमधून नौसैनिक वैमानिकाचे कौशल्य पहायला मिळाले आहे. रिअर ॲडमिरल फिलपोज न्युमूतील जे सध्या फ्लॅग ऑफिसर देखील आहेत, त्यांचा एक व्हिडिओ आहे.

संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू नौका आयएनएस विक्रांत हीची सध्या चाचणी घेतली जात आहे. या चाचणीदरम्यान फिलपोज यांनी एक हेलिकॉप्टर चालू नौकेवर यशस्वीपणे उतरवून दाखवले आहे. याचा व्हिडिओदेखील खूप प्रसिद्ध झाला आहे.

आयएनएस विक्रांत ही भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू नौका आहे. सध्या या नौकेचे समुद्रात परिक्षण केले जात आहे. यामध्ये या नौकेतील विविध यंत्रणा तपासून पाहिल्या जाणार आहेत.

हे ही वाचा:

हे सरकार नेमके कोणाचे?

सलग चौथ्या ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीत पदक

ठाकरे सरकारने ‘भिंती’ उभारूनही राज्यपाल महाराष्ट्र दौऱ्यावर

राज्याच्या खजिन्यात जमा झाला इतका जीएसटी

या नौकेची निर्मिती मूलतः कोचीन शिपयार्ड लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीमध्ये झाली. या नौकेचे प्रारूप देखील तिथेच तयार करण्यात आले. कोचीन शिपयार्ड नौकाबांधणी मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.

या नौकेचे वजन ४० हजार टन इतके आहे. या नौकेच्या बांधणीला सुरूवात फेब्रुवारी २००९ मध्ये झाली आणि प्रत्यक्षात पाण्यावर तरंगण्यासाठी २०११ साल उजाडावे लागले. वास्तविक ही नौका २०१५ पूर्वीच नौदलात सामिल होऊन कार्यरत होणे अपेक्षित होते, मात्र विविध कारणांमुळे नौकेच्या सामिलीकरणास उशिर होत गेला.

Exit mobile version