भारतीय हवाई दलाच्या आयएएफ सी १३० जे या विमानाने आव्हानात्मक अशा समजल्या जाणाऱ्या कारगिल हवाई पट्टीवर रात्री ऐतिहासिक लँडिंग केले. या संदर्भातला एक व्हीडीओ आयएआफने शेअर केला आहे. याबाबत तपशील उघड केलेला नाही.
सी १३० जे विमामाने जे रात्री उशिरा यशस्वी लँडिंग केले त्यामागे अत्यंत उत्तम नियोजन आणि पायलट कौशल्य असल्याचे अधोरेखित होते. हे यश केवळ आयएएफची क्षमताच दाखवत नाही तर त्यासंदर्भातील किती तत्परतेची बांधिलकी आहे हे सुद्धा यामध्ये दर्शवते. हिंदुस्तान टाईम्सच्या एका वृत्तानुसार कारगिल नाईट लँडिंग सराव अखंडपणे आयएएफच्या एलिट स्पेशल फोर्स युनिट यांच्या प्रशिक्षण मोहिमेसह एकत्रित करण्यात आला आहे.
हेही वाचा..
टी २० विश्वचषक स्पर्धेत विराट-रोहित हवेच!
इस्रायलने केला हमासच्या आठ हजार दहशतवाद्यांचा खात्मा
बालिकाश्रमातून गायब झालेल्या सर्व २६ मुली सापडल्या
अजित पवार म्हणाले, ८० वय झालं तरी माणूस थांबत नाही”
या पध्दतीने केवळ आयएएफच्या लॉजिस्टिक क्षमतेचेच मूल्यमापन केले नाही तर त्याच्या हवाई आणि जमिनीवरील युनिट्समधील ऑपरेशनल समन्वय देखील वाढवला आहे. हा सराव अप्रत्याशित परिस्थिती हाताळण्यासाठी आयएएफ किती सज्ज आहे, हेच यातून स्पष्ट होते. ८,८०० फुटांपेक्षा जास्त उंचीवर आव्हानात्मक हिमालयीन प्रदेशात वसलेली कारगिल हवाई पट्टी वैमानिकांसाठी अनोखी आव्हाने देणारी आहे. लँडिंग प्रक्रियेदरम्यान उच्चतम उंची, अनुरूप नसलेले हवामान आणि सोसाट्याचा वारा या सगळ्याचा समन्वय साधून अत्यंत अचूकपणे ते लँडिंग करणे हा कौशल्याचा भाग आहे.
गेल्या नोव्हेंबरमध्ये उत्तराखंडमधील प्राथमिक हवाई पट्टीवर आयएएफच्या दोन लॉकहीड मार्टिन सी- १३० जे- ३० ‘सुपर हरक्यूलिस’ लष्करी वाहतूक विमानांच्या यशस्वी लँडिंगनंतर ही कामगिरी करण्यात आली आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी जड अभियांत्रिकी उपकरणे वितरीत करण्यासाठी प्रतिकूल हवामानात नेव्हिगेट करणे या मोहिमेत समाविष्ट होते.