मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या डोळ्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया पार पडली. ठाण्याच्या रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. ‘एबीपी माझा’ने याबाबत वृत्त दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डोळ्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी त्यांनी डोळ्याची तपासणी केली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर लेझर ट्रिटमेंटद्वारे छोटी शस्त्रक्रिया पार पडली. सध्या मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर आणि उत्तम असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
युक्रेनने बुडवली रशियाची युद्धनौका
अमेरिकेकडून भारताला मिळणार ३१ एमक्यू- ९ बी सशस्त्र ड्रोन्स
मालदिवला दिल्या जाणाऱ्या निधीत कपात; अन्य देशांच्या मदतीतही घट
पंतप्रधान मोदींना पहिला ‘शिवसन्मान पुरस्कार’ जाहीर
ठाण्याच्या रुग्णालयात शुक्रवार, २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आपल्या ठाण्याच्या घरी परतले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या शस्त्रक्रियेनंतर काही काळ विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे.