29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषरक्ताच्या पिशव्या गरजूंपर्यंत उडत गेल्या!

रक्ताच्या पिशव्या गरजूंपर्यंत उडत गेल्या!

रक्ताच्या पिशव्या ड्रोनच्या मदतीने पोहोचवण्याचा हा देशातील पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा

Google News Follow

Related

खाण्याचे पदार्थ तुमच्या दारात यावेत, यासाठी काही कंपन्यांनी ड्रोनचा वापर करण्यास सुरुवात केली होती. आता आपत्कालीन घटनांवेळी औषधे आदींचा वैद्यकीय पुरवठा जलदगतीने आणि सोप्या मार्गाने गरजूंपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे. नवी दिल्लीत नुकतेच रक्ताच्या पिशव्यांची वाहतूक करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. अशाप्रकारे रक्ताच्या पिशव्या ड्रोनच्या मदतीने पोहोचवण्याचा हा देशातील पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा केला जात आहे.

‘आज, आम्ही रक्त आणि रक्ताशी संबंधित घटकांची वाहतूक ड्रोनने केली. हे घटक कमी तापमानात ठेवणे आवश्यक असते. मात्र ड्रोनने या साधनांचा पुरवठा करण्याचा प्रयोग केल्यानंतर आम्हाला असे आढळले की, या घटकांवर वाहतुकीचा कोणताही विपरित परिणाम झाला नाही. आम्ही या पदार्थांचे तापमान कायम ठेवण्यात यशस्वी झालो. यावेळी आम्ही रक्तपिशव्यांचे नमुने सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णवाहिकेद्वारेही पाठवले होते. दोन्ही नमुन्यांत फरक आढळला असता तर, रुग्णवाहिकेद्वारे पाठवलेल्या रक्ताच्या पिशव्यांचा फायदा झाला असता. मात्र ती वेळ आली नाही. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे अशा ड्रोनचा वापर आता संपूर्ण देशभरात करता येईल,’ अशी माहिती आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी दिली.

हे ही वाचा:

“सरकार घटनाबाह्य असल्याच्या बाष्कळ बाता ठाकरेंनी बंद कराव्यात”

गद्दारांच्या मागणीचा मी का विचार करू म्हणून दिला राजीनामा!

आम्हाला घटनाबाह्य म्हणणाऱ्यांना न्यायालयाने कालबाह्य केले!

ठाकरे गटाला दणका; १६ आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न विधानसभा अध्यक्षांकडे

याआधी औषधांसाठी ड्रोनचा वापर

यावेळी रक्तपिशव्या पोहोचवण्यासाठी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर करण्यात आला असला तरी करोनाकाळात अशा प्रकारे ड्रोनचा वापर करून ईशान्य भारतात औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे. या ड्रोनचे नाव आय-ड्रोन असे आहे. (आयसीएमआर ड्रोन रिस्पॉन्स अँड आऊटरीच फॉर नॉर्थ ईस्ट) या ड्रोनद्वारे ईशान्य भारतातील दुर्गम भागात लशी आणि औषधांचा पुरवठा केला जातो. हे ड्रोन खडतर भौगोलिक परिस्थितीत उदा. जमीन, बेट, पर्वतीय भागांतही चोख कामगिरी बजावतात. या ड्रोनद्वारे केवळ करोना प्रतिबंधित लशी नव्हे; तर ऑक्टोबर २०२१मध्ये मणिपूर आणि नागालँडमध्ये लहान मुलांना आवश्यक असणाऱ्या अन्य लशी, मल्टी व्हिटॅमिन्स, सुया आणि ग्लोव्ह्जचा पुरवठा करण्यात आला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा