दिल्लीतील एम्स रुग्णालयात पाच वर्षांच्या एका अक्षिता नामक मुलीवर ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. अशा प्रक्रिया होणारी हा जगातील सर्वात तरुण रुग्ण आहे, असा दावा एम्स रुग्णालयाने केला आहे. याबद्दल एम्सकडून एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, डाव्या पेरिसिल्व्हियन इंट्राएक्सियल ब्रेन ट्यूमरसाठी ‘अवेक क्रॅनियोटॉमी’ शस्त्रक्रिया म्हणून ओळखली जाते. या रुग्णाच्या मेंदूचा एमआरआय करण्यात आला त्यात तिच्या मेंदूच्या डाव्या बाजूला लागून ट्युमर दिसून आला आहे. ही शस्त्रक्रिया सुमारे तीन तास सुरु होती. ज्यामध्ये न्यूरोएनेस्थेटिस्टद्वारे भूल देण्यासाठी लागणारा वेळ देखील समाविष्ट आहे. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान ती जागृत राहिल्याने डॉक्टरांच्या टीमने ट्युमर काढण्यात यश आले.सध्या रुग्णाची प्रकृती उत्तम असून त्याला सोमवारी घरी पाठवण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी टीमचे सदस्य, रुग्णाचे कुटुंब यांच्यात दीर्घ चर्चा झाली. यावेळी डॉक्टरांच्या टीमने त्यांची समुपदेशन केले. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाला सामन्य वस्तू, सामान्य प्राणी दाखवण्यात आले. तसेच भाषा आणि सेन्सरीमोटर मूल्यांकनासाठी काही कार्ये देण्यात आली. ही मुलगी पहिलीत शिकणारी आहे.
हेही वाचा..
बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या मुक्ततेप्रकरणी सोमवारी निकाल
आयएएफ सी १३० जे विमानाचे कारगिल हवाई पट्टीवर यशस्वी लँडिंग
टी २० विश्वचषक स्पर्धेत विराट-रोहित हवेच!
इस्रायलने केला हमासच्या आठ हजार दहशतवाद्यांचा खात्मा
शास्त्रक्रीयेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्र ती इयत्ता पहिलीत शिकणारी विद्यार्थिनी आहे आणि शस्त्रक्रियेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे तिला आतुरता होती, असे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. डॉ. मिहीर पांडिया आणि डॉ. ज्ञानेंद्र पाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली डॉ. दीपक गुप्ता आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली.