लिफ्टची साखळी तुटून कोलिहान खाणीत अडकलेल्या १४ जणांना वाचवले

रात्रभर सुरू होते बचावकार्य

लिफ्टची साखळी तुटून कोलिहान खाणीत अडकलेल्या १४ जणांना वाचवले

राजस्थानच्या झुंझुनू येथे खाणीमध्ये लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना घडली. मंगळवार, १४ मे रोजी रात्री हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या कोलिहान खाणीमध्ये लिफ्टची साखळी तुटून हा अपघात घडला. यामध्ये १४ जण रात्रभर खाणीत अडकून पडले होते. याची माहिती मिळताच तातडीने त्यांना बाहेर काढण्यासाठी रात्रीच बचावकार्य सुरू करण्यात आले. तब्बल ११ तास रेस्क्यू ऑपरेशननंतर अखेर १४ जणांना बुधवार, १५ मे रोजी सकाळी सुखरुप बाहेर काढण्यात आले.

हिंदुस्थान कॉपर लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी आणि एक दक्षता पथक झुंझुनू येथील खाणीतील कामाच्या पाहणीसाठी आतमध्ये गेले होते. यावेळी खाणीत तपासणी केल्यानंतर पुन्हा वरती येत असताना अचानक लिफ्टची साखळी तुटली. त्यामुळे ते १८०० फूट खोल खाणीत अडकून पडले होते. हे एकूण १४ जण होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी करत तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. खाणीत कोसळलेल्या लिफ्टमध्ये अडकलेल्या १४ जणांची रात्रभर केलेल्या रेस्क्यू ऑपरेशननंतर अखेर सुटका करण्यात आली. यानंतर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

‘पाकव्याप्त काश्मीरची तुलना जम्मू काश्मीरच्या प्रगतीशी कुणीतरी नक्कीच करत असेल’

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे पैसे कुठे गुंतवतात?

‘स्वाती मालीवाल हिच्या जीवाला धोका’

दिल्ली: प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी चोरट्याचा २०० वेळा विमान प्रवास!

माहितीनुसार, खाणीत अडकलेल्या लोकांसाठी खाण्याचे पॅकेट, पाणी पाठवण्यात आले होते. औषधेही पाठवली होती. डॉक्टरांचे पथकही घटनास्थळी बोलावण्यात आले होते. त्यानंतर एक-एक अशा १४ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. यानंतर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची नाही.

Exit mobile version