सुब्रत रॉय यांनी दोन हजार रुपयांत गोरखपूरमधून व्यवसायाची सुरुवात

सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे निधन

सुब्रत रॉय यांनी दोन हजार रुपयांत गोरखपूरमधून व्यवसायाची सुरुवात

Sahara Group Chairman Subrata Roy gestures as he speaks during a news conference in Kolkata November 29, 2013. REUTERS/Rupak De Chowdhuri (INDIA - Tags: BUSINESS REAL ESTATE)

सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे मंगळवारी निधन झाले. सुब्रत रॉय यांचे गोरखपूरशी वेगळे नाते होते. त्यांनी केवळ येथून शिक्षणच घेतले नाही तर त्यांनी त्यांच्या व्यवसायाची मुहूर्तमेढही येथेच रोवली. केवळ दोन हजार रुपयांत सुरुवात केलेल्या व्यवसायाचा विस्तार त्यांनी दोन लाख कोटींपर्यंत केला. सुब्रत रॉय यांनी १९७८मध्ये मित्राच्या सोबतीने अर्थविषयक कंपनी सुरू केली.

सिनेमा रोडस्थित कार्यालयाच्या एका खोलीत दोन खुर्ची आणि एका स्कूटरच्या साहाय्याने त्यांनी हा मोठा पल्ला गाठला. ते तेव्हा छोट्यामोठ्या दुकानदारांकडून बचतीसाठी पैसे घेत असत. थोडेफार पैसे जमल्यानंतर सन १९७८मध्ये त्यांनी औद्योगिक क्षेत्रात पाय टाकून कपडे आणि पंखेनिर्मितीचा कारखाना उभारला. या दरम्यान ते स्कूटरवरून पंखे आणि अन्य उत्पादनांची विक्री करत असत. तसेच, ते छोट्या दुकानदारांना छोटी छोटी बचत करण्याचेही सल्ले देत असत.

या दरम्यान सहाराची ‘गोल्डन की’ योजना क्रांतीकारी ठरली. या माध्यमातून नियमितपणे निघणाऱ्या लॉटरीने असंख्य निम्नमध्यमवर्ग जोडला गेला. १९८३- ८४मध्ये त्यांचा व्यावसायिक मित्र एसके नाथ यांनी त्यांच्यापासून वेगळे होत दुसरी कंपनी स्थापन केली. याच वर्षी सुब्रत रॉय यांनी लखनऊमध्ये कंपनीचे मुख्यालय उघडले.

हे ही वाचा:

टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेवर बलात्कार!

कुत्र्याने बंगळुरूला परतून लावले विस्तारा विमान!

मायकल जॅक्सनच्या ४० वर्षापूर्वीच्या जॅकेटची किंमत २.५ कोटी!

केरळातील पाच वर्षांच्या मुलीवरील बलात्कार, हत्येप्रकरणी आरोपी अश्फाकला फाशी

सुब्रत रॉय हे बेतियाहाता येथे वकील शक्तीप्रकाश श्रीवास्तव यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहात असत. तिथेच त्यांच्या मुलांचा जन्म झाला. सुरुवातीला भारतीय रेल्वेनंतर पूर्वांचलच्या बेरोजगारांना नोकरी देणारी सहारा ही महत्त्वाची कंपनी होती. सुब्रत रॉय यांनी प्रसारमाध्यमे आणि आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून गोरखपूरमध्ये गुंतवणूक केली. येथील एका युनिटच्या उद्घाटनासाठी सन २०००मध्ये अमिताभ बच्चन आले होते. अनिल कपूर, दिया मिर्झा यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टारना गोरखपूरमध्ये आणण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते.

Exit mobile version