सीबीआयच्या संचालक पदी सुबोध कुमार जैस्वाल

सीबीआयच्या संचालक पदी सुबोध कुमार जैस्वाल

केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात सीबीआयच्या संचालकपदी आयपीएस अधिकारी सुबोध कुमार जैस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारच्या एका उच्चस्तरीय समितीकडून ही नेमणूक करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षासाठी जयस्वाल हे सीबीआयचे संचालक म्हणून कार्यभार सांभाळतील.

मंगळवार, २५ मे रोजी रात्री केंद्र सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेच्या नव्या संचालकांची नियुक्ती जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन. व्ही. रामन्ना आणि लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली. अंदाजे ९० मिनिटे चाललेल्या या बैठकीनंतरच हा निर्णय जाहीर करण्यात आला.

हे ही वाचा:

मालदिवच्या अड्डू शहरात भारताचे नवीन वाणिज्य दूतावास

नालेसफाईचा दावा फोल, टक्केवारीच्या कारभाराचे भाजपाकडून पोस्टमार्टम

‘यास’ वादळाचा मुकाबला करायला भारतीय जवान सज्ज

सुशील कुमारचे नोकरीतून निलंबन

सीबीआयचे संचालक ऋषी कुमार शुक्ला यांनी आपला कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात पूर्ण केला. तेव्हापासून सीबीआयचे संचालक पद रिक्त होते. अतिरिक्त संचालक प्रवीण सिंह हे अंतरिम संचालक म्हणून कामकाज पाहत होते. पण आता जैस्वाल हे पुढील दोन वर्षासाठी सीबीआय संचालक पद म्हणून कार्यरत असतील. जैस्वाल हे सध्या सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्यूरिटी फोर्सचे महासंचालक म्हणून काम पाहत आहेत.

त्याआधी सुबोध कुमार जैस्वाल हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांचे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार सोबत मतभेद झाले होते. कायदेशीर तरतुदी बाजूला ठेवून ठाकरे सरकारमार्फत करण्यात आलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना जैस्वाल यांनी विरोध केला होता. यावरूनच त्यांचे आणि मविआ सरकारचे खटके उडाले होते.

Exit mobile version