सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेले कित्येक दिवस भूषण देसाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात होते. भूषण देसाई शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. सुभाष देसाई यांचे पुत्र आहेत भूषण देसाई. उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि सर्वात जुने निकटवर्तीय माजी मंत्री सुभाष देसाई यांची ओळख. त्यामुळे देसाई यांच्या घरातच फूट पडून एका घरात ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट आमने-सामने येणार आहेत.
भूषण देसाई हे एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्यामुळे देसाईंच्या घरामध्येच फूट पडली आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून सुभाष देसाई शिवसेनेचा मुंबईतला महत्वाचा चेहरा आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून एकनिष्ठ राहिलेला नेता ही देसाईंची ओळख आहे. सुभाष देसाई यांच्याकडे सध्या कोणतेही पद नाही आणि मिळणार याचीही शक्यता नाही. उद्धव ठाकरे यांच्या गटाचे भवितव्य अंधातरी आहे. त्यामुळे भूषण देसाई यांनीच एकनाथ शिंदे गटाकडे जाण्याचा मार्ग मोकळा केला असावा, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे सुभाष देसाई आपल्या मुलाला ५० खोके, बोके, गद्दार अशा उपमा देणार का, अशी चर्चा होऊ लागली आहे.
हेही वाचा :
मालाडच्या आप्पापाडा येथे भीषण आग, धुराने सगळा परिसर काळवंडला
शीतल म्हात्रे व्हिडीओ व्हायरल प्रकरण एसआयटीकडे देणार
अनंतनागमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी तळ उद्ध्वस्त
सुभाष देसाई म्हणजेच आपल्या वडिलांशी बोलणे झाले आहे का, असे पत्रकारांनी विचारल्यानंतर, माझं स्पष्ट बोलणं त्यांच्याशी खूप आधीच झाले आहे. कारण मी हा निर्णय फार आधीच घेतलेला होता. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मी निर्णय तेव्हाच घेतला होता, असे भूषण देसाई म्हणाले.
यापूर्वीही शिवसेनेच्या अनेक निष्ठावंत नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. ठाकरे गटाचे खासदार गजानन कीर्तिकरदेखील उद्धव ठाकरे गटाला कायमचा जय महाराष्ट्र करत शिंदे गटात सामील झाले आहेत. अनेक आमदार, नगरसेवकांसह ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.