‘कॅम्लिन’ उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा सुभाष दांडेकर यांचे निधन

हजारो कुटुंबाना रोजगार मिळवून देणारे मराठमोळे उद्योजक अशी होती विशेष ओळख

‘कॅम्लिन’ उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा सुभाष दांडेकर यांचे निधन

‘कॅम्लिन’ या प्रसिद्ध उद्योगसमूहाचे प्रमुख सुभाष दांडेकर यांचे निधन झाले आहे. हजारो कुटुंबाना रोजगार मिळवून देणारे मराठमोळे उद्योजक अशी त्यांची विशेष ओळख होती. त्यांचे सोमवार, १५ जुलै रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर एक उत्तम उद्योजक आणि रंगांचा जादूगार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

सुभाष दांडेकर हे चित्रकलेसाठीच्या साहित्य निर्मितीतील अग्रेसर अशा कॅम्लिन उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा आणि आधारस्तंभ होते. शालेय विद्यार्थ्यांना लागणारी गणितीय उपकरणे, पेन्सिल, मार्कर, शाई यांसह चित्रकार आणि अन्य कलाकारांना लागणारे सर्व प्रकारचे साहित्य, कार्यालयीन उत्पादने आणि व्यावसायिक उत्पादनांची निर्मिती कॅम्लिन या कंपनीकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. बजारातही या कंपनीचे मोठे नाव आहे.

हे ही वाचा:

धार भोजशाळा-कमल मौला मस्जिद परिसरात सापडली सरस्वतीची मूर्ती

वजन कमी करण्यासाठी डबाच न खाण्याचा केजरीवाल फॉर्म्युला

पूजा खेडकरचा आणखी एक कारनामा, नाव बदलून यूपीएससीची दिले दोन अटेंम्प्ट !

मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींचा भाजपात प्रवेश !

सुभाष दांडेकर हे गेली अनेक वर्षे या कंपनीची धुरा संभाळत होते. बाजारत स्पर्धा करत असताना दांडेकर यांनी कधीही उत्पादनांची गुणवत्ता आणि मूल्यांशी तडजोड केली नाही. काळानुसार बदलत गेलेल्या तंत्रज्ञानाचा पूरेपूर वापर करून सतत नवे प्रयोग करण्यावर त्यांनी भर दिला. कर्मचाऱ्यांच्या हिताला आणि श्रमाला त्यांनी कायम महत्त्व दिलं. जे मिळवलं आहे त्यावर समाधान न मानता आयुष्यात नवी उंची गाठण्यासाठी ते प्रयत्नशील होते. प्रत्येक काम अधिकाधिक चांगलं करण्यावर त्यांचा कटाक्ष होता.

Exit mobile version