काही महिन्यांपूर्वी दहावी आणि बारावीच्या परीक्षा पार पडल्या होत्या. सध्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासणीचे काम सुरू आहे. मात्र, उत्तर पत्रिकांमध्ये विद्यार्थ्यांनी लिहिलेली उत्तरे पाहून शिक्षकांनी आणि शिक्षण मंडळाने डोक्याला हात लावला आहे. विद्यार्थ्यांचे हे नियमबाह्य वागणे खपवून घेतले जाणार नसल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.
काही विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेत खाणाखुणा करण्यात आल्या आहेत. तर, काहींनी मोबाईल क्रमांक लिहला आहे. शिवाय सिनेमामधील काही संवादही विद्यार्थ्यांनी लिहिल्याचे समोर आले आहे. मला पास करा अन्यथा आत्महत्या करेल असेही लिहण्यात आले आहे. त्यामुळे अशाप्रकारे आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोटीसा देऊन सुनावणीसाठी बोलावले जात आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारे आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ५०० आहे.
सर कृपया मला पास करा, नाहीतर घरचे लग्न लावून देतील. पास नाही झालो तर वडील खूप मारतील. मला परीक्षेत पास नाही केलं तर मला आत्महत्या करावी लागेल, अशी वाक्य लिहिण्यात आली आहेत. पुष्पा सिनेमातील संवाद देखील विद्यार्थ्यांनी लिहिले आहेत.
उत्तरपत्रिकांमध्ये उत्तराच्या व्यतिरिक्त काहीही लिखाण करणे आक्षेपार्ह समजले जाते. तर प्रत्येक कृतीसाठी मंडळाची काही नियमावली असून, त्यानुसार कारवाई केली जाणार आहे.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही, हे न्यायालयाचे मत महत्त्वाचे!
गद्दारांच्या मागणीचा मी का विचार करू म्हणून दिला राजीनामा!
‘मिशन थर्टी डेज’ साडेसात कोटीचे ड्रग्स जप्त; ३५० जणांना अटक
पंतप्रधान मोदी जूनमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासत असताना या परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाच्या सुमारे चारशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दुसऱ्याचेच हस्ताक्षर असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर शिक्षण मंडळाने अशा विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना नोटीस पाठवत, चौकशीसाठी बोलावले आहे. या सर्व विद्यार्थ्यांची मंगळवारी ९ मे पासून चौकशी केली जात आहे. तसेच गरज पडल्यास संबंधित केंद्रप्रमुख आणि पर्यवेक्षकांनाही चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.