चेंबूरच्या आचार्य कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद

मुलींनी बुरखा घालून प्रवेश करण्याचा केला प्रयत्न

चेंबूरच्या आचार्य कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद

कर्नाटकमध्ये हिजाबवरून जे नाट्य घडले होते त्याची पुनरावृत्ती आता मुंबईत झाली आहे. चेंबूरच्या आचार्य आणि मराठे कॉलेजमध्ये हा प्रकार पाहायला मिळाला. बुरखा घातलेल्या काही मुली कॉलेजमध्ये प्रवेश करत होत्या. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. कॉलेजमध्ये प्रवेश करण्यासाठी बुरखा काढून या असे या रक्षकाने सांगितले. तेव्हा या मुलींनी आम्ही आतमध्ये जाऊन बुरखा काढतो असे सांगितले. त्यावरून हा वाद निर्माण झाला.

 

 

या कॉलेजमधील मुलांसाठी गणवेश आहे. पण या मुली गणवेशावर बुरखा घालून आल्या होत्या. तेव्हा सुरक्षा रक्षकाने त्यांना अडवले. तेव्हा या मुलींनी वाद घालायला सुरुवात केली. यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात या मुली सुरक्षा रक्षकांशी वाद घालताना दिसत आहेत.

हे ही वाचा:

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह लिहिणाऱ्या ‘शिदोरी’ वरही गुन्हा दाखल करणार

गुरूजी भिडे आणि जातवादी किडे

मुंबईत २६/११ पेक्षा मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा होता कट

भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत १५ पदांसाठी दुप्पट अर्ज

 

२०२२ मध्ये हिजबचे आंदोलन देशभर चालवण्यात आले होते. पहले हिजाब फिर किताब हा नारा देऊन हिजाब हा आमचा चॉईस आहे असे वातावरण तयार करण्यात आले. ते प्रकरण कोर्टात गेले होते. हिजाब घालण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाही, अशी भूमिका मुलींनी घेतली होती. त्यामुळे त्या मुलींना परीक्षेलाही बसता आले नाही. याचे पडसाद परदेशातही उमटले होते. अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारनेही हिजाबच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता.

Exit mobile version